Dinesh Pandurang Bhrushundi दिनेश पांडुरंग भृशुंडी 02/05/2021

‘Star of the week– Mohan Kundle*
Welcome Dinesh, Have a cheerful week ahead 🥂🍷
Star of the week
I wanted to be the last कडी in this series but Hitendra put me in an awkward position for naming the next star . At the same time making it easy by tagging Suchta’s name
Previous stars were 4 bankers in a row. Here I am suggesting Dinesh भृशुंडी as star for 2nd May – 4 the in a row from Pendharkar Sirs tuitions. Needless to say even otherwise he was on my card. Looking ahead to hear more about another हनुमान from हनुमाननगर 🌷🥂 आशुतोष चितळे
मित्रवर्य दिनेश
Dinesh for everyone दिन्या for Narendra, .(…….)for Alka- काही जगावेगळ असल्यास you can disclose😊. My schooldays memories about him are relatively less & more after we met in Noida / Delhi. He was benchmate of Hitendra. Me & Ajit probably used to sit behind them. ते दोघंही अभ्यासात हुशार पण स्वभावाने एकदम वेगळे. चंचल Hitendra v/s कविमनाचा दिनेश. भगवानजाणे how they could go along with each other.
Dinesh too like Hitendra changed jobs not cities (संगती संग दोष:) – Ashok Leyland, Eicher, Escorts Yamaha, Bicycles & back to tractors New Holland till 2003
- 2003- 2006 GM qualify at GKN
- 2006- 2008 Director Quality General motors Indian operations & then suddenly going from South Pole to North
Tractors to Aviation. He joined GMR – Delhi International Airport in 2008 & retired as chief Terminal operation officer (a tough job) in 2019.
Alka his अर्धांगिनी is from Pune (आमच पुणे) but merged her identity with him & North Indians- Delhites You are lucky Dinesh. She is good Artist & host too. Held many exhibitions at Delhi & Pune. आपल्या सर्वांसारखा ( me at least) दिनेशही गोगलगाय आहे 🤗😷 They are blessed with 2 kids Not deviating from std formula हम दो हमारे दो – अभिषेक & मधुरा. Abhishek has done PhD in the theory of computation. Recently married to sweet American girl Tara . Presently he is with Bloomberg based at New York. Madhura a born artist from the age of 4 has done MSc in economics from Uk, अरंगेत्रम in 2014 Dedicated herself to भरतनाट्यम – now associated with her Guru Padmashree Geeta Chandran.
दिनेश I wish you अलका + मधुरा happy, healthy & long life 🌷🌹I will be sharing my memories about him during this week Ashutosh चितळे
दिनेश भृशुंडी म्हटल की नजरेसमोर येतो तो कविमनाचा,मितभाषी व लवकर व्यक्त न होणारा असा आमचा सहाध्यायी. शाळेत तर एकमेकांशी काही बोलायचा प्रश्नच नव्हता.११वी नंतर दिनेश व हितेन्द्र आमच्याकडे अधे मधे येत असत.तेव्हा गप्पांमधे तो बराच कळत गेला.नंतर नोकरीच्या निमित्ताने तो नागपूर सोडून गेला व मग काहीच संबंध आला नाही.तो नागपुरला माहेरी येत असे तेव्हा कधीतरी भेट व्हायची.त्याच्या लग्नानंतर तो दिल्लीत स्थिरावला आमच्या मुलीच लग्न झाल्यावर ती पण दिल्लीला गेली. आमच तिच्याकडे जाण व्हायचं. तेव्हा आशुतोष दिनेशला फोन करून त्याच्या व्यस्त दिनचर्येतून त्याला भेटायला जात असे.फक्त आशुतोषच कारण दोघांनाही आपापली सुख-दु:ख शेअर करता यायची नं.
दिनेश GMR दिल्ली एअरपोर्टवर मोठ्या पदावर कार्यरत होता.त्यावेळी त्यानी कित्येक लोकांना मदतीचा हात दिला.अगदी अनोळखी असले तरी.आम्हाला दिल्ली airport वर VIP treatment असायची.त्याची सुविद्य पत्नी अलका ही पण माझी चांगली मैत्रिण आहे . ती उत्तम artist आहे व मुलगी मधुरा भरतनाट्यम मधे निपुण आहे.दिनेश violin शिकत आहे व तो सहजपणे कविता करतो.आशुतोषनी नम्रपणे जे स्वत:ला व दिनेशला गोगलगाय म्हटले आहे त्यात अजिबात तथ्य नाही.दिनेश पण गरीब बिचारा category मधला नाही त्याचा problem आहे की तो लवकर व्यक्त होत नाही त्यामुळे लोकांचा गैरसमजच होतो.😊😊😊
दिनेशनी माझ्याबद्दल लिहितांना मला जो मान दिला त्याबद्दल मी त्याची ऋणी आहे.पण दिनेश आपल्या conversation मधे मी जे काही बोलते ते सगळ माझ्या रुटीन मधे असत. फक्त तुला त्याच अप्रुप वाटत इतकच. दिनेश एक प्रेमळ मुलगा आहे. दिल्लीत असला तरी त्याला आईबद्दल वाटणारी काळजी त्याच्याशी बोलतांना जाणवते. त्याच आणि लेकीच अस एक special नात आहे. तस प्रत्येक बाप लेकीमधे विशेष bonding असत व जे काम बायकोला at times(convince करायच)जमत नाही ते मुली चुटकीसरशी करतात अलका पण माझ्या ह्या मताशी सहमत असेलच.
अशा ह्या आमच्या कविमनाचा मित्र,उत्तम कलाकार अलका व उत्कृष्ट भरतनाट्यम् dancer मधुराला खूप शुभेच्छा .तुमच पुढील आयुष्य तुमच्या मनासारख जावो ही सदिच्छा!!! सुचेता चितळे.
मितभाषी, सुस्वभावी, अभ्यासु वृत्तीच्या व कविमनाच्या दिनेशला ह्या आठवड्याचा स्टार म्हणून जो मान मिळाला आहे त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन !!!
खरे तर शालेय शिक्षण संपल्यानंतर माझी व दिनेशची भेट नाही. परंतु शालेय जीवनातली त्यांच्याबद्दलची एक आठवण अजूनही मनात आहे ती म्हणजे त्याच्या वहितील काळ्या किंवा ब्लू- ब्लॅक शाईने काढलेले सुंदर व वळणदार अक्षर…
दिनेश व त्याच्या कुटुंबीयांना पुढील आयुष्य असेच आनंदमय व निरामय लाभो हीच सदिच्छा…💐💐🙏
अविनाश दाणी
दिनेश माझ्याबरोबर ५ वी पासून होता. मला वाटते तो जवळपास ७-८वी पर्यंत रविनगरला राहत असे. त्यानंतर तो हनुमान नगर मध्ये शिफ्ट झाला. (मला वाटते २०२ हनुमान नगर). त्याच्या काकाच्या लग्नाला मी आठवीत किंवा नववीत असताना हनुमान नगर मध्ये गेलो होतो. आकांत सर त्याच्या नात्यात होते. (शाळेतल्या अगदी कमी शिक्षकांना टोपण नावे नव्हते त्यात आकांत, सोनी असे थोडे फार होते.)
वागीश्र्वरीची वीणाच वाणी
घडवून जाती शब्द लेणी
अलंकारिली मातृभाषा ज्याने
असा दिनेश तृप्त तेजाने
स्वानुभवाने आलेली दृष्टी
सांगे सर्वांना चार गोष्टी
कुणी कुणाच्या करी ही कविता
वाहते जिच्यातून जीवन सरीता
खळवळे अडखळे कधी फेसाळे
परी अखंड शोधे वाट सागरासाठी
कोपेल शापील कुणी दुर्वास
समिधाच सुख्या नसे ओलावा
कोठुनी फुलांपरे मकरंद मिळावा
फक्त एकच असे आकांक्षा
अक्षर अग्नी क्षणभर फुलवावा
शाम आकांत
सातवी पर्यंत आमच्या वर्गशिक्षिका असलेल्या थत्ते बाईंनी आम्हा काही निवडक हुशार मुलांना मागच्या बाकावर बसवले आणि त्यानंतर तीच सवय आम्हाला लागली. पण त्यात दिनेश नव्हता. थत्ते बाई नसल्याचा फायदा घेऊन तो पुढल्या रांगेत बसायला लागला. आता पुढच्या रांगेत बसायला लागल्याने आणि पूर्व नागपुरात राहायला लागल्यामुळे साहजिक आमच्यातला संवाद कमी व्हायला लागला. शाळे नंतर तो तुटलाच. त्यानंतर कित्येक वर्षांनी (बहुदा आशुतोष कडून) त्याचा नंबर मिळाल्यावर मी त्याच्याशी बोललो होतो. पण भेट झाली नव्हती. मग एक दिवस अचानक भेट झाली ती दोन तीन वर्षांपूर्वी.
पाचवी ते सातवी पर्यंत दिनेश हा माझा जिवलग मित्र होता. आम्ही मधल्या सुटीत गळ्यात गळे घालून बोलत बसत असू. त्याची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. दिनेश बसने रवि नगरला जात असे. पण नंतर काही काळ असा आला की तो चालत माझ्याबरोबर गिरीपेठेपर्यंत यायचा.(तेव्हा मी गिरिपेठेत राहायचो) रामदास पेठ ते गिरीपेठ आणि नंतर रवि नगर असा एकंदर ५-६ किमी तो चालत करायचा.
मला वाटते पाचवीत असताना मी एक कविता केली होती. नंतर कधीतरी ती शाळेच्या वार्षिक अंकात ती छापून आली होती. तेव्हा हुरूप येऊन अजून काही कविता केल्या. आणि आठवीत असताना त्या वार्षिक अंकात छापायला दिल्या होत्या. एकाच्या नावावर कविता छापल्या जाणार नाहीत असे जाणून काही मुलांच्या (मला वाटते काळीकर, वाळुंज कर )नावाने त्या मी दिल्या होत्या. आणि त्याही छापून आल्या होत्या. त्याच वेळी दिनेशने त्याची पहिली (मला माहित असलेली) कविता लिहिली होती. माझ्या आठवणीत ती १९७१ च्या युद्धावर आधारित होती.
वर्गाचे हस्तलिखित वार्षिक दोन तीनदा निघाले असेल. त्यात त्याचा सिंहाचा वाटा असे. त्याचे अक्षर सुंदर वळणदार असल्याने प्रत्यक्ष लिखाण तोच करायचा.
दिनेश चा साहित्यिक प्रवास नंतर बराच पुढे गेला असावा. त्याच्या हल्लीच्या कविता लक्षात राहण्या सारख्या आहेत. त्याने कवितासंग्रह प्रकाशित करावा असे त्याचे लिखाण असते. (आमच्या वर्गात पांढरीपांडे म्हणून मुलगी होती तिचा कविता संग्रह आणि त्यावरील गाण्याची सी डी प्रकाशित झाली आहे).
सगळ्यांसारखा त्याचा जीवन संघर्ष सुरू झाला आणि त्यात त्याला या कलागुणांना लोकांसमोर मांडायला मिळाला नसेल असे धरून चालतो. पण आता त्याने तो करावा. हल्ली त्याची माझी भेट अचानक झाली ती माझ्या चित्र प्रदर्शनात. तो त्यावेळेला ठाण्यात एका लग्नाला आला होता. त्याची बायको अलका ही पण चित्रकार असल्याने ती ठाण्यातील चित्रकार बोधनकर यांना भेटली. आणि ते सरळ दोघांना प्रदर्शनात घेऊन आले. माझ्यासाठी तो एक सुखद धक्का होता.
त्याची बायको ही एक चांगली चित्रकार आहे तिचे सोलो exhibition दिल्लीत झाले आहे. मुलगी उत्तम नर्तकी आहे (मुला बद्दल मला फारसे माहित नाही). असे कला गुणांनी युक्त कुटुंब निवृत्ती नंतर पुण्यात येण्याची शक्यता आहे (माझी माहिती जुनी आहे). तसे झाले तर पोपी हातवळणे आणि दिनेश असे दोघे पुण्याला येतील आणि एकत्र भेटण्याचा प्रसंग येऊ शकेल असे वाटते. त्याच्या प्रतीक्षेत.
प्रमोद सहस्त्रबुद्धे
१९७५ नंतर आपल्या वर्गातील फार थोड्या जणांची प्रत्यक्ष भेट होण्याचा योग आला. पहिली भेट झाली ती १९७६ साली अभ्यंकर ची, ईंजीनियरिंगच्या प्रवेश घ्यायला सांगलीच्या प्रवासात. अभ्यंकर पुण्यात प्रवेश घेणार होता. त्या नंतर बहुतेक जुलै ९७मध्ये New Holland Tractors मधे मला HR ने आपले क्वालिटी हेड श्री. भ्रुशुंडी असे म्हटल्यावर पहातो तर साक्षात दिनेश पुढे ऊभा. वयानुसार आलेले प्रौढत्व सोडून जवळपास शाळेत होता तसा च धीरगंभीर.
एकदा आम्ही सर्व भेटल्यावर पुढील ८/१० महिने खूप छान गेले. दिनेश, अलका, अभिषेक, मधुरा ची कंपनी माझ्या मुलीला खूप आवडत असे. दिल्ली हून केतकी व शारदा पुण्याला परत येताना आदल्या संध्याकाळी आम्ही भेटलो ते खास ती व मधुरा मुळे.
त्यानंतर मी दिल्ली सोडतांना दिनेश स्टेशन वर सोडायला आला होता. गाडी सुटताना म्हणाला की मी फार चांगले लिहू शकत नाही पण आपण संपर्कात नक्की राहू. काही दिवस उत्साह टिकला पण. नंतर माझ्या आळशी पणाने जो खंड पडला तो आता संपला. 🌹दिनेश, अलका, अभिषेक, तारा (!!) व मधुरास अनेक शुभेच्छा🌹
संजय माणकीकर
Dinesh, as I remember in school a shy,soft person,generally away from us mischievous.Therefore not able to get glimses of his poetic mind then which is seen thro his sharings in gp.In fact,I hv not met Dinesh since school days.so very few memories,but I must say he is always willing to help people.My experience is recent,early last year while he was with GMR at Delhi I had a good interaction n recd helping hand from him.It so happened,that my daughter who is at Delhi was coming home to mumbai in month of May 2020.She was delayed too much in airport security due to extraordinary rush,n by the time she reached boarding gate,flight was closed.she panicked n called me.i instantly knew who to contact n called up Dinesh,who at that time was in hyderabad.he asked his deputy at Delhi airport immdtly to help my daughter.I was impressed with this.I hope to see Dinesh personally soon.About Alka Vahini ,I know nothing yet can say for sure,she managed or maintained dinya to be just same as he was in school.Great.Wish him n his family incl wonderfull children a very happy , prosperous n healthy life
Sushil Deshmukh
मी हे मागच्या आठवड्यात पोस्ट करणार होतो पण ..तसंही आत्ता मी दिनेशसाठीच शोधले. आणि गिऱ्यासाठी सरीताचा आणि डॉ. शेवगावकर या दोघांचा. राजीव पारखी
दिनेश
अरे आपण कॉलेज मधे असताना पण अधून मधून भेट व्हायची. त्यांनंतर मात्र मी कलकत्त्याला All India Marketing चा head झाल्यावर जेंव्हा दिल्लीला आलो तेंव्हा तुझा शोध घ्यायचं ठरवलं आणि Escort पासून सुरुवात केली ते New Holland मधे आपली भेट होईपर्यंत. त्या दिवशी तू मला हात धरून घरी घेऊन गेलास. घरी गेल्यावर मला अलकाची एक कॉमेंट आठवते.
तू आत फ्रेश व्हायला गेला असताना ती मला म्हणाली की आज जुना मित्र भेटला म्हणून हे इतके आनंदात दिसताहेत की काय करू आणि काय नको असं झालंय. मित्र भेटीचा असा आनंद मी देखील पहिल्यांदाच अनुभवला. माझ्या आठवणीप्रमाणे आपण बहुधा तू GM ला पण एकदा भेटलो होतो.
नंतर मला वाटतं 2017 ला मी आलो होतो तेंव्हा मी तुझ्या ऑफिस मध्ये आलो होतो. तेंव्हा देखील एअरपोर्ट वरून मला घ्यायला गाडी पाठवली होतीस. त्याआधी तुझ्या घरी गणपती बसतात तेंव्हा एका वर्षी जेवायला आल्याचं आठवतं. Feb. 2020 मधे मनिषाने मला हडस मध्ये एका competition साठी observer म्हणून बोलावलं होतं. Prof. पेशवे पण होते. Lithium-ion battery या विषयावर स्पर्धा होती.
राजीव पारखी
दिनेशदा चा माझा तसा कधी संबंध आला नाही तरीही एक कर्तव्यदक्ष व तडफदार व्यक्तिमत्त्व àahe he mi निश्चितच म्हणेन 🙏 मिलिंद सोमण
“दिनेश” या अफलातून व्यक्तीशी माझी पहिली ओळख ७ व्या वर्गापासून. मुख्य म्हणजे हनुमान नगर मधे त्यांनी नवीन घर बांधलं आहे आणि नुकतेच स्थानांतरित झाले आहेत कळल्यावर मी एका संध्याकाळी त्याच्या घरावर धाड टाकली. काही दिवसांचीच ओळख असल्याने वर्गमित्र या पलीकडे दिनेश जवळही माझ्याबद्दल घराच्याना सांगण्यासारख काही विशेष नव्हतं. मीच माझी जेव्हढी जमेल तेवढी बढाई मारून आपली ओळख त्याच्या घरच्यांना करून दिली अणि शेवटी माझी आई हडस मध्येच शिक्षिका आहेत सांगून शिक्कामोर्तब केलं.
तोच मला वाटतं “दिनेश चा मित्र किंवा पांडे बाईंचा मुलगा” म्हणून मला संबोधायचा पहिला आणि शेवटचा दिवस. नंतर मात्र मी त्याच्या घरी पाण्यात साखर विरघळते तसा समाविष्ट होऊन गेलो. एकत्र शाळेत जाणे येणे किंवा अभ्यास करणे या काही विशेष उल्लेखनीय गोष्टी नसाव्यात वाटण्या इतकं मी भृशुंडी खंदानात त्यांच्यातलाच एक होऊन गेलो. फक्त दिनेश चे आई वडिलच नाहीतर भाऊ बहिण काका आत्या मावश्या अणि जेवढे काही दिनेशचे त्याच्या माहितीत असतील त्या सगळ्या नातेवाकां कडे माझे जाणे येणे होते. एखादा नवीन पदार्थ केला दिनेश च्य आईने आणि माझी आठवण काढली नाहीं असं झालं नाही. मी पण टेलीपाठी असल्यासारखा बरोबर पोहोचतो च होतो. मला आठवते मला आलेलं पाहून त्यांची कौतकाची पहिली प्रतिक्रिया “आला वास चिवड्याचा ?” अशीच राहायची.
दिनेश बरोबर राहून संगतदोष लागला तसा मी अभ्यास करण्यात जरा गंभीर होऊ लागलो. ९ वी ते ११ वी पर्यंत अभ्यासाचा ग्राफ थोडा थोडा चढत जाऊन ८ वी पर्यंत १४-१५ च्या रेंज मध्ये असलेला माझा परिक्षेतला अनुक्रम ५ व्यां पर्यंत चढला त्याचे श्रेय दिनेशलाच. मला वाटतं १ गिरिश, २ काळीकर, ३ दिनेश, ४ सुचेता आणि ५ हितेंद्र हा अनुक्रम १०-११ वित टिकून राहिला.
मॅट्रिक नंतर आमचे शैक्षणिक मार्ग वेगळे झाले.दिनेश VRCE आणि मी LIT त. पण मिळणे एकत्र राहणे टिकून राहिले. कॉलेज गॅदरिंग ला तो नेहमीच मला घेऊन जायचा. डिग्री घेतल्यावर नागपूर सुटले. दिनेश चे काका मला इंदोर ला घेऊन गेले ते काम करत असलेल्या केमिकल फॅक्टरी त मला नोकरीसाठी. ५ वर्षा मी इंदोरला होतो. त्या दरम्यान त्यांनी माझे पितृतुल्य संगोपन केले. आजही ते मला माझ्या वडीला इतकेच वंदनीय आहेत. आपल्या कुटुंबातला च एक सभासद बनवून घेणारा असा मित्र किंवा घर विरळा.
माझ्या लग्नात दिनेश हजर होता मेघाशी पण त्याची चांगली मैत्री जमली. एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारण्या इतके संबंध अनौपचारिक होते. मी त्याचे लग्नात का नव्हतो हे आजही मला प्रयत्न करूनही आठवत नाही. मुलगी पुण्याची आहे आणि लख्ख गोरी आहे हे मात्र दिनेशच्या आईने विशेष लक्ष वेधून सांगितले हे मात्र चांगलं आठवते. गोरा रंग हा खरंच त्यावेळी महत्वाचा मुद्दा होता. माझ्या आठवणीत आजवर मी सावळ्या भृशुंडी घराण्यात फक्त दोनच गोरे रंगाची माणसे पाहिलीत. एक दिनेश ची आई आणि दूसरी अलका. दिनेश माझी चूक सुधारू शकतो.
दिनेश माझी भेट नंतर कधी मधी होत गेली. प्रामुख्याने मधुराच्या कार्यक्रमात दिल्लीला, माझ्या मुलीच्या लग्नात बडोद्याला, कधी नागपूरला. नवीन पिढी शी ओळख जरा यथा तथाच. पण मधुरा अभिषेक भेटले तेव्हा आपुलकीने बोलले. अलका बरोबर फार तर २-३ वेळाच भेट झाली असेल पण मेघा बरोबर बोलणं होत असतं. एकमेकांमध्ये असलेल्या कलाकाराला जाणून घेत असतात. कोणाबद्दल बोलणं त्याच्याबद्दल वाटण्यापेक्षा फार कठीण आहे. बोलायला खूप काही आहे पण वेळ आणि जागा कमी. मला खात्री आहे दिनेश ला पण जरी माझ्यासाठी बोलायला वेळेची कमी असेल पण हृदयात जागेची कमी नक्कीच नाही. पुनः एकदा दिनेश व त्याच्या कुटुंबियाना माझ्या आणि मेघाच्या खूप खूप शुभेच्छा.
हितेंद्र पांडे
![]() |
![]() |
![]() |
All three posted by Hitendra,
Hitendra, Good one ये अपुनका स्टाईल है. आशुतोष
आशुतोष झकास मांडणी
ते म्हणतात नं- One picture speaks thousand words
या सात pics मधे गेली पस्तीस वर्षांच प्रेक्षण, एखाद्या चलचित्रासारखं, मन:पटलावर होऊन गेलं
फक्त काही क्षणात Thanks दिनेश
Abhishek & Tara pronounced as ट्यारा
Tara has done Masters in Music (Jazz Piano) & owns a music company- Sweet Harmony. No wonder she is sweet too. Jesus bless the couple
🌷🌹. Ashutosh
Dinesh 🙏🙏🙏 फार वर चढवू नकोस. Would like to remain to the ground only. You know there is a saying, More and more monkey climbs up, More and more he exposes his balls to people watching him.
Anyway it was very heartening to find me so close to you. Convey my best wishes to Alka, Abhishek-Tara, Madhura. BTW is aii in Delhi or at 202 ?
Last I spoke to her when she was with you. Shall definitely drop at you once this pandemic subdues Hitendra
दिनेश आठवणी १ :
Sushya, u don’t remember glimpses of Dinesh ‘s poetic mind in school . It’s ok not your fault getting old ? 😀 Actually it is only Bhagyarekha Kulkarni who had that privilege. दिनेश कविता करून लहान लहान चिठ्ठया तिच्या बाँकाजवळ भिरकवायचा (teenage crush?)
त्या गोळाकरून तिने काय केलं हे हितेंद्रच सांगु शकेल. He alone may be knowing about chemistry between them. I have one/ two such those चिठ्ठया – how – not to ask. Will share some tomorrow 😀
आशुतोष
प्रिय मित्र दिन्याच्या गुणांचा उहापोह अनेक वर्गबंधुंनी केला आहे. त्याखेरीज इतरकाही आठवणींना उजाळा देत आहे. खरेतर माझा व दिन्याचा संबंध शाळेनंतर जास्त आला. VRCE त ५ वर्ष आम्ही एकाच वर्गात ( माननीय टिल्ल्यासकट) होतो शिवाय Final yearचे project Partner असल्यामुळे संबंध दृढ झाले. पुढे फाटाफुट होउन आम्ही एकमेकांच्या स्पर्धेत असणा-या (Ashok Leyland/ Telco) कंपन्यांमध्ये प्रविष्ठ झालो . त्यानंतर तब्बल २५ वर्षानंतर VRCE 1980 batchच्या एकत्रिकरणात भेट झाली.
मध्यंतरी परत संपर्क झाला नाही पण काही वर्षानंतर एकदिवशी कामावर असताना माझा त्याकाळातील अधिकारी एका व्यक्तींला आफिसमधे घेउन आला व meet Dinesh अशी ओळख करून द्यायला सुरवात केली. माझी व दिनेशची ३५ वर्षापासुन ओळख असल्याची माहिती दिल्यावर Howard Davis बेशुद्ध होण्याच्या बेतात होता. दिनेश GM India मार्फत Australia ला आला होता.
आम्ही दोघंही नागपुरात धुमकेतु सारखे उगवत असल्यामुळे क्वचित भेट होत असे. ताश्कंदच्या वास्तव्यात via दिल्ली जाताना बरेचदा भेटलो व वहिनींचा पाहुणचार पण अनुभवला. एकदा माझ्या अमेरिकन सहका-याबरोबर प्रवास करीत असताना दिल्लीला काही तास मुक्काम होता तेव्हा दिनेशच्या ओळखीने आम्हाला थेट विमानापासुन VIP lounge पर्यंत नेण्याची सोय झाली होती. ते बघुन माझा सहकारी चाटच पडला व Gosh you have some serious connections असा शेरा नोंदवला😀
सर्वात महत्वाचे म्हणजे माझी आई ताश्कंदला पडुन पाय मोडला होता. तेथे फार जास्त दिवस राहण्याची सोय नसल्यामुळे operation नंतर ३ महिन्यानी परत नागपुरला आणावयाचे होते. ह्या कामगिरीची भिस्त दिन्यावर टाकली व दिल्लीत उतरवून काही तास विमानतळावर काढुन पुढे नागपूरच्या विमानात बसविण्याचे काम दिन्याच्या मदतीने सुकर झाले. ह्या आठवड्याचा मानकरी म्हणुन पद्दात काही लिहावे असा संकल्प करून काल कामाला लागलो पण अनेक तास व कागद वाया घालवल्यावर यह अपने बस कि बात नही ह्या निष्कर्षला पोहचलो.
कविवर्य श्यामची मदत घेण्याचा विचार मनांत डोकावला पण वांग्मय चौर्य योग्य होणार नाही म्हणुन तो विचार रद्द केला. आता पुन्हा भेट कुठे होते ते बघु . दिल्ली, पुणे, नागपुर , New York, Detroit असे अनेक ठिकाण आहेत. All the best & keep the Kavitas coming ता. क. ( नेहमी प्रमाणे )
Narendra
|
१ अमेरिकेला आलास तर ये
आमच्याघरी ( पुणेकर निमंत्रण ) |
२ दिन्या लेका अमेरिकेला
येउन न भेटता गेला तर माझ्याशी गाठ आहे ( नागपुरी निमंत्रण ) दिन्या भो …..US आकर हमारे घर नही आया तो तेरी खटियाखडी कर दुंगा अस्सल नागपुरी |
||
|
नरेंद्र छान लिहिलय,
त्या साठी सादर काव्य नुपूर अनुभव आणि वाणी समृद्धि पूर दिव्यांसाठी बांधले शब्दांचे गोपूर शब्द सृष्टीतून चितरे भावभधुर तव वाणीच्या पाण्यावरती नौका सदाविहरती देश विदेशातून जिवलग इथवर येती दूर सदैव राहो वाङगंगेचा पूर तव शब्दांना वेगळाच नूर शाम आकांत |
वाह शाम वाह, काय मस्त मांडणी You made my ये शाम मस्तानी,
‘सरीता’ शब्दावरचा Punch तुझ्या शब्दांचा अद्भुत संच आठवलं ‘पाठका’यन-‘धिक् तां च तां च मदनं च इमां च मां च ॥’ कुठे दडला होता तुझ्यातले कवी? प्रस्तुत कर अशीच काव्य नवनवी! शब्दमदिरेची असते वेगळीच एक धुंदी भेटू कधी करू तुकबंदीची जुगलबंदी दिनेश |
||
दिनेश आठवणी २ God Send man Dinesh
Some times during 2016 I was talking to my Senior friend Advocate Mushtaq Ahmad Moon then around 65 from Sopore (J & K ) He was at Delhi airport & worried. I could feel the anxiety in his voice. His wife was coming from Dubai who never travelled alone before & had no experience whatsoever about the formalities to be completely from the time of landing till exit. I said wait let me check whether I can help you out & will revert within 1 hour. I called Dinesh to find out whether he can do anything in this matter.
My normal experience was he rarely attends any call during office hours but luckily he did that day understood the situation & said just message his number & rest you forget. Numbers were exchanged and flight details were shared. But being from the Advocate family wanted to reconfirm I called Dinesh again after office hours to know what arrangements he has made. Again recd short reply aarey baba don’t worry I will take care leaving me on oxygen.
I accordingly conveyed adv friend. Dinesh made full arrangements right from receiving her at plane exit door, immigration, baggage collection & safely connecting with the young man waiting outside literally within 20 minutes. My friend just could not believe it & had no words to express his gratitude. He hugged Dinesh & kissed him on his forehead- it’s a way to pay respect & love. Mr Moon always tells me आपको अंदाजा नही कि उस दिन कितनी परेशानीसे आपने बचाया & I will never forget this in my life
When I told him Dinesh is my school friend he was not only surprised but shocked also – rightly so . I can imagine Dinesh helping anyone of us but third person that too taking so much interest . Hats off for you Dinesh
God bless you 🌷🌹 Ashutosh
Ashutosh 🙏🙏🙏
It was just a normal Guest Facilitation was trying to just practice the principle of ‘अतिथी देवो भव’ which I professed at DEL Airport Dinesh
दिनेश आठवणी ३
Dinesh was using a very old mobile with push buttons. It was so old that at times I felt like throwing up in a dustbin. In my Delhi visit I was sitting in his chamber at GMR & offered him a touch phone. Most probably this was recorded & within one week the company provided him new touch phone
He is still repenting – बटण दाबण बंद झाल 😛😀🤗🙊 आशुतोष
![]() |
![]() |
Ashutosh
I remember this more correctly. You not only offered but stuffed the spare phone with all the accessories in my bag( which was again gifted by you – on a previous visit after my birthday without any occasion as such. Dinesh
Ashu, You deprived him of the pleasure of pressing. Sushil
सुचेता, $$ धन्यवाद मि.त.वा.(मित्र तत्ववेत्ता वाटाड्या)! $$
“गोगलगाय…..”उल्लेख रानडे सरांचा एक प्रसंग आठवून गेला…त्यांच्या Vicky च्या पेट्रोल टॅंक मधे कुणीतरी साखर टाकली व त्यामुळे इंजिन मधे कार्बन व साफसफाईचा खर्च …माझ्यावर डाउट – पांडे बाईंची मध्यस्थीवर त्यांचे माझ्यावर कामेंट – ‘तुम्ही त्याला ओळखत नाही. तो तर आहे-
खालीमुण्डी, पाताळधुण्डी, दिनेश भृशुंडी’
Turn around झाला- खुप प्रयत्नांनी व त्यांच दरम्यानं झालेल्या त्यांच्या appendicectomy operation नंतर त्यांची केलेल्या सेवेनी…$$
राहावा सर्वांचा स्नेह जोपर्यंत राहील देह
🙏🙏दिनेश
आशुतोष
तुझ्या सगळ्या thoughtful
Post साठी – 🙏🙏🙏व
खालील 👇क्वालीटीज साठी-
उत्साह, उर्जा, उन्मेष
उत्स्फुर्तता व उद्देश
उत्श्रुंखलता अन् उन्नतता
उदारता उत्कटता उदात्तता
दिनेश
दिनेश, हे म्हणजे लईच झालं
आमच्या स्वर्ण-चौकटी मधून, आशुतोष बद्दल लिहीले आधी. राजीव पारखी
उद्या सुचेता बद्दल लिहीन. आता हितेंद्र बद्दल
Dinesh
संजय!
न्यु हालंड ट्रॅकटर्स मधे खरंचंच छान वेळ गेला तुझ्याबरोबर! Official meeting मधे कोणी पंजाबीत सुरू झाला तर त्याला कट करायला आपण मराठीत सुरू व्हायचो. तुझ्या कडून methodic and meticulous व्हायला शिकलो. Detail orientation काय ते समजलो. तुला आठवत नसेल कदाचित, पण MS excel, word and ppt चे सुरवातीचे धडे पण तुझ्याकडूनच घेतले होते.
Family level वर पण छान सूत जमलं होतं पण ते तुझ्या महाराष्ट्रात परतायच्या निर्णयामुळे पुढे गेले नाही. पण नंतर common interest and field मुळे परत तारा जुळल्या.
Hope the melody and rhythm continues… शारदाला व तुला दीर्घायुरारोग्यासाठी शुभचिंतन व केतकी आणी तुझ्या नातवाचे अभिष्टचिंतन
दिनेश
राजू!
दोन गोष्टी एकदम डोळ्यांसमोर आल्या. शाळेत तुझ्या सारख्या कलाकारांपासून inspire होऊन तबला व नंतर violin शिकायचा असफल प्रयत्न,(बुलबुलतरंग वर हिंदी गाणी मात्र बऱ्यापैकी निघायची) नंतर ७वीत ‘बालवीर आम्ही – आम्ही वीरबाला..’ ह्या गाण्यात असफल भाग घेणे. शाळेनंतर आपण एकदाच भेटलो बहुतेक फरीदाबादला तुझ्या भावाकडे. काही वर्षांपुर्वी पुन्हा GMR DIAL मधे professionally connect झालो व नंतर अधुनमधून भेट. Hopefully will meet you soon God Bless All Best
Dinesh
धन्यवाद अविनाश दाणी
अनमोल तुझ्या आठवणी
ही सुंदर लिपीची कहाणी
‘एकताटें’ची ‘सुलेखन’करणी
तेव्हा डोळ्यात यायचे पाणी
वळणदार हस्ताक्षर ‘त्यांनी’
पाडले आपोआप अंगवळणी
दिनेश
![]() |
Ashu
Arey boing tari dakhavla pahije hote Sushil Sushya, It was chartered flight 😀 Ashutosh |
![]() |
![]() |
Sushil
Appreciate your kind remembrance and words- that call from you and the response was thought a part of duty, it paved the way for renewed ties and our conversation afterwards. Dinesh
प्रमोद सहस्त्रबुद्धे- एकवार अभिवादन!
नावाप्रमाणे आनंदी,
कुशाग्र अशी स्मृती
व आडनावाप्रमाणे
अत्यंत तल्लख बुद्धी !
द्विवार अभिनंदन!!
जुन्या सुदंर आठवणी
त्यांची सोपी, सरळ
अगदी दिलखुलास
मनस्वी अभिव्यक्ती !!
त्रिवार अभिष्टचिंतन!!!
लिखाण-चित्रकलेसाठी
आणी तुझ्या उन्मुक्त-
प्रेरक विचारशैलीसाठी.
अर्थात तुम्हा उभयंतांसाठी!!!
दिनेश
मित्रगणहो!
व्यक्त व अव्यक्त, अपार स्नेहाच्या वर्षावासाठी खूप खूप आभार! तुम्ही सर्वांनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मला शालेय जीवनात influence केलं आहे हे मात्र नक्कीच. ह्या सप्ताह-तारा उपक्रमामुळे तारा पुन्हा जुळुन येतात हे सुद्धा अगदी खरे. मस्त वाटलं, यंग वाटलं! दिलखुलास हसलो, मनोमन मनमोकळेपणान रडलो पण.
Rejuvenated, refreshed and most importantly REPURPOSED वाटलं!
ह्या ग्रुपची धुरा सांभाळणारे मित्र; (माझ्यासारखे धूमकेतू )अधुनमधुन हाजरी लावणारे मित्र व most importantly इथल्या प्रेषितांचा(posts) मुक(ट)पणे आस्वाद घेणार मित्र- सर्वांचे मन:पुर्वक पुन्हा आभार!
आणखी दोन मुद्दे-
१. हा सप्ताहतारा उपक्रम dp पासुन सुरू होउन ह्या फार्मॅट मधे नुकताच आला. ह्या दरम्यान जे लोकं cover झालेत(only dp change) त्यांना पुन्हा नवीन फार्मॅट मधे कव्हर कराव हा प्रस्ताव – आशुतोषने नेहमीप्रमाणे पुढाकार घ्यावा.
२.पुढचा सप्ताह-तारा म्हणून परममित्र प्रमोद चे नाव सुचवतो.
आणी शेवटचे पण महत्त्वाचे: सर्वे सन्तु निरामय: ही आपल्या पृथ्वी साठी प्रार्थना करतो.
Bye For Now
दिनेश
Nicely expressed.. ( about Hitendra) words don’t fail when feelings are true. तुझ्यातला क्युरीयस, नाटी, विटी, एक्सपरिमेंटल चाईल्ड सतत अलाइव्ह राहू दे! … 👌👏👏. My wishes for your friendship and crime partnership. Vishwas Vidwans


![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |














Leave a Reply