Anil Gangadharrao ingole अनिल गंगाधर राव इंगोले 27/06/2021
|
|
|
Welcome dear Anil Ingole to celebrate the week of stardom.
This is a week when you will know the affection of our batchmates and we all shall know your life journey, your struggles, your achievements.
Wishing you a happy week, healthy and peaceful life with loving family and company of friends although virtual as of now.
Vishwas
Vishwas,
Thanks…… 🙏 मनःपूर्वक आभार👏.. धन्यवाद🌹
अनिल
Anil, welcome to the galaxy. I ran out of time to write about our dear friend Sharad so I wanted to make sure this time I jump ahead. We will always remember you as “Saglyaa Nagpur la paani paajnaraa” veer, and how can we forget your art work as a photo shopper. Met you only twice since leaving the school- both because of Reunion arranged by Ashutosh. Hope you continue to enjoy your time with kids and grandkids. Also looking forward to messages from poets – original as well as copy cats.
Narendra देशपांडे
अनिल
सातासमुद्रापलिकडुन तुझे कौतुक तेही in advance from Narendra. You are lucky & special person Welcome & Enjoy your week ahead 🌷
Ashutosh
The reunion taught how friends came with many layers, so we should never judge a book from its cover.
Shyam Akant
Anil is truly star of gp for ever not just week.Wish him best time
Sushil Deshmukh
🙏🙏 मी अनिल इंगोले……… ओळखले असाल……१९७३-७५ शाळेतील आठवण आपणास नसेल….मान्य…कारण मी आपणामधे बराच उशीरा संपर्कात आलो.त्यामुळे वर्गमित्र म्हणून अश्या आठवणी बहुतेक कोणाकडे नसेल किंवा माझ्याकडे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
फक्त काही वगळता… त्यामुळे कसे व्यक्त व्हायचं ह्या विचाराने मी चिंताग्रस्त होतो………. आहे.तरी पण काही शाळेतील प्रसंग माझ्या जीवनात बदल घडवून आणले… परंतू जास्त ओळख नसताना २००० ला संपन्न झालेल्या रौप्यमहोत्सवी सम्मेलन मधे या प्राण्यांला आपल्या कळपात एकरूप करून घेतले. आणि आता या what’s app Group नी आपूलकी निर्माण केली….. आशुतोष… खूप खूप धन्यवाद🙏
अश्या ही परिस्थिती त Star of the week कोणत्या कारणाने हे मी सांगू शकत नाही.माझ्यातील अवगुण कि गुण🤔
तसेच आशुतोष व सर्व प्रिय मित्रांनो मी मातृभाषेतून व्यक्त झालो तर चालेल कां?आणि कोणते प्रसंग माझ्या पूढील वाटचालीस प्रेरणादायी ठरले,ते व्यक्त केले तर चालेल ना? . .थोडा वेळ लागेल माझ्या तब्बेतीमुळे. .. क्षमस्व👏 अनिल
अनिल,
भाषा ही फक्त व्यक्त होण्याचे साधन, भावना महत्वाच्या. ज्या प्रसंगांनी तुला घडवल ते सांगणे खूप चांगले. तेंव्हा मित्रा व्यक्त हो. प्रेम असो वा दुरावा, का विचार करतो आता, व्यक्त हो, स्वस्थ हो, निर्धास्त हो. मनापासून व्यक्त व्हायला मातृभाषाच हवी. आपल्यापैकी बहुतेकांनी मातृभाषेशी संबंध ठेवला आहे 😀.
विश्वास विद्वंस
Vishwas ,
Nice thought’s & perfect encouraging words for Anil
Ashutosh
व्यक्तीमत्व: विस्तीरर्ण भाल प्रदेश , भेदक नजर , निमुळती हनुवटी , सरल नसार्ग्र (नासिका) , धनुष्य रुप अधर, शु….. आवाजाचा वेध घेणारे कर्ण , खळखळणारे निर्मल मन , अन निर्णय घेण्याची क्षमता , द्रुष्टी नाविन्य शोधण्याची ……. सदैव हात जोडून सामोरं ……:अचल , निर्माण , लक्ष 😊
प्रदीप दिवाळे
|
|
🔹Wonderful Very Creative 😀👏👏Vishwas 🔹भारदस्त मराठा – सुशील 🔹एकदम कडक – अविनाश Super👌👌👌👍 लई भारी ……..भाऊ 🙏 अनिल |
मित्रवर्य अनिलराव नमस्कार
सर्वप्रथम मन:पुर्वक अभिनंदन या आठवड्याचा मानकरी करिता निवड झाल्याबद्दल🌷.आपण टीम हडस ११ चे शुक्रतारा – सर्वमित्रांच्या वाढदिवशी ख-याअर्थी चांदणे शिंपणारा – जागुन रात्री १२ नंतर न चुकतां शुभेच्छा संदेश पाठवणारा त्रिवार धन्यवाद 🙏🙏🙏 आजमात्र तु साध्यासरळ , सोज्वळ, पुजेतबसलेल्या दिनेशलादेखील टोपी घातलीस.थकलोरे बाबा मराठी लिहून 😀
2001 get together was joint effort of Hitendra Rajiv Dhananjay & myself to contact maximum classmates within 1 week we could get in touch with maximum & missed few like Dharmanand, valunjkar etc.
You rightly pointed out everyone’s reaction when you came – हा प्राणी कोण ? It was almost same reaction for few more also. It was but natural because of long gap However it was memorable & wonderful evening – your speech was special so also अभिप्राय given by Sangita .
After2001 everyone got busy in their profession & children’s education Here we are again on one platform becoz of Pramod. This time almost all are there but more vacuum is created. Let us reduce the gap 😊.
Your hobby is संपर्क & संवाद साधणे. I find 2nd part missing. Get recharged like Pradeep. Don’t fall into trap of मुकसंवाद . ( not मुखसंवाद ) Be in touch . भाषा is no barrier दोन पंजाबी मित्रांमधील देखील चालेल😊. I know you have excellent skill of communicating with people then why not friends 👬
I wish you & Sagita cheerful years ahead & blessings to sons 🥀🌷
Ashutosh चितळे
🙏 अध्याय १ – अनिल इंगोले
शाळा प्रवेश (१९७३)
वडिलांची यवतमाळ वरुन नागपूर ला बदली .. सहाजिकच आमचा शाळा प्रवेशाचा प्रश्न…हडस हायस्कूल ची निवड….जागा शिल्लक नाही.. दुसऱ्या दिवशी पुन्हा संपर्क..एक जागा उपलब्ध…. परंतू उमेदवार दोन..काय करायचे.. आदरणीय कै.पि.आर.जोशी सर मुख्याध्यापक…त्यांची थोडी ओळख…त्यांनी दोघांची ही तोंडी व लेखी परीक्षा घेतली…निकाल माझ्या बाजूने लागला.. आनंद पण मनात भीती..
एका लहानशा शहरातून मोठ्या शहरातील नामांकित शाळेत प्रवेश..मनावर खूप दडपण..कोणी ओळखत नव्हते..नविन प्रवेश घेणारा मी एकटाच.. एक-दोन दिवस कोणाशीही न बोलताच काढले.त्यानंतर आले मा.एकताटे सर आणि जो सुरू केला माझ्या नावाला ओवाळण्यास सुरुवात…कि माझी ओळख सर्वांना झाली.त्यामधे काही जूने विद्यार्थी होते.
हळूहळू प्रथम माझ्या आठवणी प्रमाणे शरद, जयंत, श्रीनिवास, अविनाश,उमेश,अजित यांच्या ओळखी झाल्या. चला थोडा धीर वाढला..तरी वर्गात कुजबुज होतीच याला प्रवेश कसा मिळाला.. कांहीं नी विचारणा सुध्दा केली.. त्यामुळे पुन्हा मनात चलबिचल..पण नंतर सुरळीत चालू झाले. अपवाद मा.श्री एकताटे सर
मी हुशार नव्हतोच पण अगदीच ढ पण नव्हतो.परंतू दडपण मात्र होत.जे दडपण माझ्या वर एकताटे सरांनी निर्माण केले त्यामुळे मी दडपणाखाली १० वर्ग पूर्ण केला. शेवटी मला कळले कि सर माझ्या वर कां …नाराज आहेत..कां राग करतात…तर प्रवेशासाठी दुसरा जो उमेदवार होता तो एकताटे सरांचा होता,ज्याला प्रवेश नाही मिळाला. धन्यवाद👏👏
Wondering what to write, Thanks for you opening out. Our relationship started much earlier with friendship between your father n my father. We carried on with your entry in hadas.We never fought,n had a very cordial time during school days.
Frankly, it was all good going in school,and outside our parents meeting ,some of those in my house, though I wouldn’t know much from their interaction. Once I got in LIT n after to mumbai,all these were seized. It was so pleasant to see you in gp n continue with what stopped since hadas days. I’m very much impressed with your artwork,n photo management even at short notice,n has given all colored memories to cherish in future.
Wish you a good health n nice time with excellent family you are in. Once again thanks anil,for your support in keeping this gp colourful
Sushil Deshmukh
🙏 अध्याय 2 – अनिल इंगोले
….१० वी पास .. आनंद.. नामांकित शाळेत टिकलो….११ वी मधे अनेकांशी सूर जूळून आले.शाळेच्या स्नेहसम्मेलनात मी कब्बडी खेळलो….माझा हा खेळ बघून.. अनेकांच्या संपर्कात आलो… मी ज्यूनिअर नॅशनल खेळलो होतो.विंचूरकर सरांनी दखल घेतली होती व एका क्लब मधे जात जा म्हणून आग्रह धरला होता…. त्यावेळी मराठा लाॅन्सर मधील अनेकांना ओळखत होतो….. परंतू शाळेचे दडपण मनावर होतेच.. तू मॅट्रिक होऊच शकत नाही,कसा होतो ते मी बघतो. शेवटी ११वी जून्या अंतिम बॅच चा १०० टक्के निकाल लागला… त्यामधे माझा समावेश होता..😂तेव्हां च निकाल १०० टक्के लागला ना….नापास करण्यासाठी बराच प्रयत्न झाला परंतू यश आले नाही.. मना मधे एक खंत घेऊन शाळेतून बाहेर पडलो… आभार👏
आशुतोष या सर्व शाळेतील प्रकारामुळे माझ्या मनात एक जिद्द निर्माण झाली होती..कि ढ जरी असलो तरी उच्च शिक्षण घेईल… त्यावेळी जेवढे कळत होते त्याप्रमाणे…😂
पुढील प्रवास सूरू झाला…कमी मार्क मिळाल्यामुळे मी BArch ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो पण प्रवेश मिळाला नाही..मी नंतर B Sc ला प्रवेश घेतला..नंतर शासकीय तंत्रनिकेतन ला Diploma ला प्रवेश घेतला…१९८० ला Diploma झालो.घरची परिस्थिती व कौटुंबिक जबाबदारी ची जाण व भान ठेवून मला नाईलाजाने नौकरी स्विकारावी लागली. महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनि:सारण मंडळ, नागपूर ला कनिष्ठ अभियंता म्हणून १९८० ला रूजू झालो.
१९८०-१९८५ पर्यंत विविध पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण केली.१९८५ ला दोनाचे चार हात झाले लग्न😔 पदविकाधारक असूनही मुलगी मिळाली याचा जास्त आनंद झाला….. पण शाळेतील आघात मनावर होताच…. आणि नौकरी करून शिक्षण घ्यावयाचे असेल ठरवून १९८६ ला पहिल्या मुलाचा प्रणिल चा जन्म झाल्यानंतर B.E.(Part time) ला प्रवेश घेतला.नौकरी सांभाळून रात्री ला काॅलेज करून १९९० ला BE पदवी प्राप्त केली… आणि १९९० ला च दुसरा मुलाचा पियूष चा जन्म… पदवी अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट व हा प्रोजेक्ट दोन्ही एकाच वेळी पूर्ण करण्यात यश मिळाले.
|
|
|
🙏 अध्याय 3 – अनिल इंगोले
सम्मेलन-२००१
शाळा सोडून २५ वर्ष…तो पर्यंत काही ठराविक शाळेतील मित्रांच्या भेटी होत होत्या..संजय, अविनाश, धनंजय, मिलिंद,सगदेव, जयंत,प्रदिप….आणि अचानक एक दिवस संदेश प्राप्त झाला…. आशुतोष चा कि १९७५ च्या आपल्या बॅच चे सम्मेलन आहे… हितेंद्र, नरेंद्र ,राजीव, धनंजय यांच्या पुढाकाराने.. ..तू ये….. खूप खूप आनंद झाला…२५ वर्षांनंतर आपले शाळेतील सहकारी मित्र भेटत आहे…मी आवर्जून उपस्थित राहिलो.अनेकांनी नाव सांगितल्यानंतर व प्रवेश निश्चित झाल्यावर ओळखले… कि हा प्राणी आपल्या सोबत होता😂
वर्गात होतो म्हणून मी सर्वांचा वर्ग- मित्र होतो….अशी कोणतीही आठवण/प्रसंग नव्हते… परंतू सर्वांशी भेट व चर्चा झाल्या नंतर असे वाटले कि यांच्याशी बराच घनिष्ठ संबंध होते…पण नंतर झाले…. आभार व धन्यवाद आयोजक मित्रांचे👏 आणि हो…तिथे प्रामुख्याने दोन गुरुजनांचे दर्शन झाले… एका नी घडविले तर दुसर्यानी आधार दिला होता…… आदरणीय एकताटे सर व सोनी सर🙏
आदरणीय एकताटे सरानां बघितले व शाळेतील सर्व प्रसंग आठवले… त्यांच्या अपेक्षा पेक्षा किंचित पुढे गेलो होतो…. शेवटी मला त्यांचे आभार व्यक्त करण्याची संधी मिळाली… सर आपल्या आशिर्वाद व तिनं बोटांच्या प्रसादानी मी अभियंता झालो व आज नागपूर करांना पाणी पाजत आहे….. अनेकांनी अर्थ वेगळा काढला होता…पण खरंच नागपूर पाणी पुरवठा योजनांची महत्वाची बहुतांश कामे माझ्या देखरेखीखाली पूर्ण झालेली होती व खामला/जयताळा भागात भिषण पाणी टंचाई मधे पाणी उपलब्ध झाले होते..तो आनंद वेगळाच होता.. ही एक मोठी उपलब्धी माझ्या प्रवासातील🙏
अविस्मरणीय घटना
माझ्या साठी….सांगणे मला आवश्यक वाटते…..आपले सम्मेलन संपन्न झाले…व काही दिवसांनी मी लक्ष्मी नगर झोन कार्यालयात गेलो… प्रवेश दाराजवळ वयोवृद्ध व्यक्ती समोर आले…मी आदरानी मान खाली करून नमस्कार केला व पूढे निघालो…. तेवढ्यात आवाज आला…शुक….शुक….मी मागे वळून बघितले…तर ते वयोवृद्ध मला बोलावित होते. मी त्यांच्या जवळ गेलो………. तू इंगोले कां….हडस ला होता ना…. तूझ्या वर खूप अन्याय झाला…आता काय करतो……मी निशब्द झालो…पुन्हा आदराने नमस्कार केला व न बोलताच निघून गेलो……….ते वयोवृद्ध कोणी नसून आदरणीय एकताटे सर होते……बस मला मोठे यश मिळाल्याचे आनंद झाला….धन्य झालो…. ते घडले फक्त सम्मेलनामुळे…….. धन्यवाद🙏🙏
अनिल, तू लिहिलेले अध्याय वाचून खूप छान वाटले. तुझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल वाचून माहितीत खूप भर पडली. असे झाले असल्याचे वाईट ही वाटले. अध्याय ३ मध्ये त्याची कबुली तुला मिळाली याचेही अप्रूप वाटले. (झालेल्या हेटाळणी बद्दल जयेंद्र मोटाघरेची अशीच आठवण आहे.)
माझ्या आठवणीत दहावीत असताना तू, संजय माणकीकर, दीपक कुलकर्णी, खामगावकर आणि अभ्यंकर असे बाहेरील शाळेतील विद्यार्थी आले. त्या दोन वर्षात यातील सर्वांशी नीट मैत्री होऊ शकली नाही त्यामुळे अधिक परिचय व्हायचा राहून गेला.
मला आठवते की तू आमच्या रोजच्या क्रिकेट मध्ये एकदा खेळायला आला होतास. त्यावेळी मोठा runup घेऊन वेगाने गोलंदाजी करणारे आमच्यात कुणी नव्हते. तुझी तशी गोलंदाजी अजून आठवत आहे. (अजित ओक देखील तसे करायचा. आणि बाऊंसर्स टाकायचा). प्रमोद सहस्त्रबुद्धे
वर्ग १० व ११वीतील अनिल ईंगोले व प्रदीप राणे बरोबर चांगल्या प्रकारे मैत्री जमली होती. राणे सोबत शेजारच्या बाकावरची म्हणून तर अनिल सोबत समदु:खी म्हणून मैत्री. समदु:खी अशासाठी की एकदम लहान गावातून मोठ्या शहरातील नामवंत शाळेत प्रवेश व काय होईल/कसे होईल ही धाकधूक. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसात अनिल बरोबर सूर जुळले ते अगदी अभ्यासापलिकडच्या अडचणी/काळज्या शेयर करण्यापर्यंत टप्पे सहज पार पडले.
त्याची कबड्डी व क्रिकेट मधील निपुणता वादातीत होतीच, पण त्याने एवढे आघात व अपमान सहन केले हे तेव्हा त्याच्या कडे पाहून वाटत नसे. आता त्याची धग अध्याय वाचून जास्त जाणवते. म्हणतात ना की in every risk there is an opportunity. आलेल्या परिस्थिती तून योग्य संधी शोधून अथक परिश्रमाने यश मिळवलेस त्या बद्दल अभिनंदन.
पुढील आयुष्यात निरामय प्रगती साठी समस्त ईंगोले परिवाराला शुभेच्छा. 👍
संजय माणकीकर
Dear Anil
Amazing skills of Marathi writing you have. When I read I could picturize event marvelous presentation apart from your skills of photo art Dot at 00.00.10 hrs your BD wishes come first with good frame and later others…..Hats off Ashu to unfold hidden talent those who have !!!!
Wishing Anil happy healthy and long life with your beloved family. Pl pen out about more your experiences/stories will love to read Shrikant Sagdeo
⭐ सर्वप्रथम अनिलचे ह्या आठवड्याचा मानकरी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..⭐
मला जो अनिल कळला तो एक शांत, प्रेमळ, मनमिळावू, जिद्दी पण अतिशय नम्र असा मित्र. दहावीला जेंव्हा तो यवतमाळ येथून आपल्या शाळेत बदलून आला तेंव्हा साहजिकच त्याच्या मनावर दडपण होते. आपल्या वर्गातील बहुतेक मुले पाचवीपासून एकत्र/एकाच शाळेत शिकलेले असल्यामुळे आपली एकमेकांशी बऱ्यापैकी मैत्री होती. त्यामुळे साहजिकच नवीन आलेल्या अनिलला सुरुवातीला मित्र जमाविण्यास थोडे जड गेले. परंतु काही दिवसांनी आमच्या सारख्या काही मुलांशी त्याची मैत्री हळुहळु वाढत गेली, जी आजपण कायम आहे.
त्याच्या मनमिळावू व निगर्वी स्वभावामुळे तसेच त्याच्या खेळातील (विशेषतः कबड्डी व क्रिकेट मधील ) नैपुण्यामुळे ही मैत्री घट्ट होत गेली. कबड्डी खेळात प्रतीपक्षाच्या गोटात जावून, मोक्याच्या क्षणी, हमखास ३-४ गड्यांना बाद करून येणारा अनिल आजही स्मरणात आहे.
शालेय शिक्षणानंतर त्याने Govt. Politechnic नागपूर येथे Civil Engg. ला एडमिशन घेतली. कालांतराने मी सुध्दा Mechanical Engg. ला त्याच कॉलेजला एडमिशन घेतली. त्यामुळे आमच्या भेटी अधून मधून होत असत. लग्नानंतर त्याने part-time कॉलेज जॉईन करून जिद्दीने B.E. सुध्दा पूर्ण केले.
मला असे वाटते की अनिलने स्वतःचा परिचय करून देतांना एका गोष्टीचा उल्लेख टाळला. ती गोष्ट म्हणजे जे लोक त्याला लाजरा – बुजरा समजत होते त्याच अनिल ने त्याच्या ऑफिस मधील कर्मचाऱ्यांच्या युनियन चे समर्थपणे नेतृत्व केले व त्याच्या अनेक सहकाऱ्यांना न्याय मिळवून दिला. निवृत्ती नंतर आजही तो हे कार्य निःस्वार्थ पणें करीत आहे..Great👍
अनिल व त्याच्या कुटुंबीयांना पुढील आयुष्य सुखी, समाधानी व निरामय लाभो, हीच सदिच्छा..💐💐🙏
अविनाश दाणी
🙏 अध्याय 4 – अनिल इंगोले
शाळेत घडलेल्या घटना झाले गेले विसरुन गेलो…… नौकरी, अभियंता संघटना व परिवार या मधे व्यस्त राहिलो.अनेक पाणी पुरवठा योजनांची महत्वाची कामे केलीत… वरिष्ठ कार्यालयात कार्यरत राहिलो…. कामामुळे व संघटनात्मक कामामुळे थोडे नाव ,लौकीक प्राप्त झाले… सामाजिक बांधिलकी नी अनेकांना प्रामुख्याने त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली..आपली पुस्तके व आर्थिक मदत देऊन….व याच व्यस्ततेमधे २००३ ला VNIT , Nagpur मधे M.Tech( Env) ला प्रवेश घेतला… वयाच्या ४५ व्या वर्षी….मोठा मुलगा B.E.1st year ला व मी M.Tech 1st year ला😂…२००५ ला M.Tech पूर्ण केले….दिक्षांत समारंभात वयस्कर विद्यार्थी म्हणून उल्लेख व कौतुक झाले…..आणि वडिलांची इच्छा पूर्ण केली…गरिबी व कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण करता आले नव्हते…..शिक्षणाची जी खंत होती ……ती पूर्ण झाली….नौकरी, संघटना व परिवार सांभाळून शिक्षण पूर्ण केल्याचे समाधान झाले….हे सर्व करताना घरच्यांची प्रामुख्याने धर्मपत्नी सौ.संगिता ची खूप मदत झाली…यामधे पूर्ण श्रेय पत्नी चे आहे…🙏
२००५ ते २०१६ पर्यंत मी बाहेर-बाहेर च नौकरी निमित्त राहिलो….३१/१०/२०१६ ला उपअभियंता पदावरून गोंदिया वरुन सेवानिवृत्त झालो…. एकूण ३६ वर्षांची नौकरी व नौकरी करून शिक्षण पूर्ण केले. सेवानिवृत्ती नंतरही सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी संघटनेचे काम करीत आहे….अनेकांचे प्रश्न, समस्या शासन दरबारी मांडून सोडविल्या ….सोडविण्यात येत आहे..
सध्या मी आणि नातू या नात्यामध्ये वेगळ्याच विश्वाचा आनंद घेत आहे…… धन्यवाद🙏🙏
अध्याय पूर्ण😂😂😂😂सुटले तुम्ही अनिल इंगोले
प्रथम सर्वांचे खूप खूप मन:पूर्वक आभार व धन्यवाद👏 मला मनसोक्तपणे व्यक्त होऊ दिले…..रान मोकळे झाले… त्याप्रमाणे मी अध्यायात व्यक्त झालो…. निश्चितच या पेक्षा खूप मोठे भरिव यश आपण प्राप्त केलेले आहे…तरी आपण मला मौलिक सूचना/प्रतिक्रिया व्यक्त केल्या….काही नी प्रत्यक्ष भेट घेतली….तर काहींनी
दूरध्वनी व्दारे संपर्क करुन संवाद साधला….. धन्य झालो….. 👏 तुमच्या सारखा परिवार मिळाला… माझ्या सारख्या ला तुम्ही सर्वांनी समजाऊन घेतले….. त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद…..
आपल्या परिवारातील एक…..माझी व त्याची एक रास………नाव अ पासून……जन्म तारीख सारखी..२८/१०/१९५८….लग्न तारीख जवळपास सारखीच …..दोन दिवसांचा फरक….. शाळेत एकत्र कब्बडी खेळलो……… अजूनही दूरध्वनी व्दारे संपर्कात………असा एकमेव असलेला… तुमच्या सर्वांच्या परवानगी ने आज पुढील Star of the week म्हणून घोषित करतो…
I would like to suggest🌹 Ajit Oke🌹 as Star of the week for the next week. Thanks🙏🙏 Anil
|
|
Look at Anil Standing as if for National Anthem |
Anil
Breaking the rule of this group to wish you Happy Birthday. You are another year older, another year wiser, but same as always! Very particular in wishing us all on our birthdays without a single miss or any delay. Your artistic pictures cheers us early morning and make our day memorable.
You are true spirit of our group. Three cheers! 💐💐 Vishwas 28/10/2023

Leave a Reply