Ashutosh n Sucheta Chitaley आशुतोष व सुचेता चितळे 25/04/2021
![]() |
![]() |
आशुतोष माझ्या प्रथम रडार वर आला ते एक उत्तम खेळाडू म्हणून. खो खो, कबड्डी खेळताना त्याची चपळता नजरेत भरण्या सारखी होती. यथावकाश ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मला आठवते, शाळेत असताना मी, दिनेश, धण्या त्याच्याकडे धंतोलीच्या घरी क्रिकेट खेळायला जात असू. त्यावेळी आजच्यापेक्षा चितळेवाडा खूप मोठा होता. मागे प्रशस्त अंगण होते. तिथे आमचा धुमाकूळ चालत असे. त्याच्याकडे एकसे एक मोठे मोठे कुत्रे होते. त्यातल्या त्यात एका काळया श्र्वानाशी माझे जरा बरे सुत जमले होते. माझ्या हाफ प्यांट चा फडलेल्या तुकड्याची चव त्याला जरा आवडली असावी.
आशुतोष च्या जवळीकित एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे विनयशीलता. ऑल इंडिया रिपोर्टर सारख्या एका प्रतिथयश संस्थापनेचा तो एक भविष्यकालीन भागीदार होता. पालकांची सांपत्तिक स्थिती ही कुणाच्या हातात नसते. श्रेयावर हक्क तर मुळीच नसतो पण इतरांवर रोब झाडायला पुरेशी असते. जरा दर्पात असता तर अगदीच अस्वाभाविक वाटले नसते पण याच्या वागण्या बोलण्यात कुठेच याचा लवलेश सुद्धा नव्हता. सहज सर्वामध्ये “पानी तेरा रंग कैसा” प्रमाणे मिळून मिसळून होता. आणि आजही तो तसाच आहे. समाजाकडून आलेली सुबत्ता एक ऋण म्हणून समाजाला मदत रूपाने परत करण्यात कधीच मागे पुढे न पाहणारा. असेसुद्धा लोक मला भेटले आहेत जे आशुतोष नी केलेल्या मदतीचा उल्लेख करतात जी की तो करून केव्हाच विसरलेला असतो.
कुठल्याही कार्यात स्वखुशीने पुढाकार घेणारा. सन २००० वर्षी आपल्या ११वी ची टीम एकत्र करणे, एकत्रीकरण घडऊन आणणे, तसेच व्हॉट्सअँप ग्रुप बनवणे ही सगळी कामं त्याचीच.
१९८० नंतर नोकरी निमित्त मी नागपूर सोडले. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात अन्नासाठी दाही दिशा भ्रमंती सुरू होती. आशू पण आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात मुरत होता. यथावकाश विवाह झाले संसार वाढला. आठवणींवर विस्मरणाची हलकी हलकी पुट चढत गेली. सन २००० मध्ये मी एक वर्षासाठी पुनः नागपूरला होतो तेव्हा मात्र पुन्हा जुन्या मैत्रीला जे नवे रंग चढले, ते एका वर्षातच मी पुनः नागपूर सोडले तरीही अजूनही टिकून आहेत. नंतरसुद्धा मी जिथे जिथे नोकरी निमित्त भटकलो सगळीकडे त्याने हजरी लावली. अगदी मागल्या वर्षी जयपूरला येऊन गेला. आपला ६० व्या वाढदिवसाला आग्रहाने घरी बोलावून उभयतांनी मला व मेघाला पण सत्यनारायणाच्या पूजेत बरोबरीने बसवून सहभागी करून घेतले. असे निर्व्याज आपुलकीची मैत्री टिकावनारा मित्र विरळा. या यशस्वी प्रवासात त्याला साथ देणारी त्याची सहचरी म्हणजे सौ. सुचेता. पूर्वाश्रमीची कु. सुचेता भालेराव. १९७५ टीम ची मेंबर. आपल्या ट्वीन ⭐ ऑफ दि वीक ची बरोबरीची मानकरी..
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
सौ. सुचेता चितळे पूर्वाश्रमीचे कु. सुचेता भालेराव माझ्या प्रथम स्मरणात आहे ती sharp फीचर्स असलेली बोलक्या डोळ्यांची चुणचुणीत मुलगी. हडस हाई स्कूल मध्ये ५ व्या वर्गात. मैत्री करावी अशी. मी ४थ्या वर्गापर्यंत सेवासदन प्रायमरी शाळेत होतो. तिथे आम्ही सर्व मुलं मुली एकत्रच शिकायचो, भांडायचे, खेळायचो. हडस हाय स्कूल पण को एड च होतं पण जरा निराळीच प्रथा होती. प्रायमरी स्कूल नी खेळीमेळीचे शिक्षण दिले, तर हडस नी मुलं मुलींना, कोरोना रोग्यासारखा एकमेकांपासून दूर राहण्याचे संस्कार दिले. त्यामुळे एकमेकाकडे बघायलाच मज्जाव तर बोलणं फार दूरची गोष्ट होती. मैत्री वगैरे तर विचारतीत च जमा.
५वी ते ११ वी चा प्रवासात तिची अभयास्यातली चिकाटी, खेळातला उत्साह, शालीन पण तडफदार स्वभाव या सर्व गोष्टी तिच्या गुणामध्ये भर टाकत गेल्या. ७ वर्ष एका वर्गात राहूनही अनोळख्या प्रमाणे राहिल्यावर तिचा समोरासमोर सामना झाला तो पेंढरकर सरांच्या घरी ट्यूषण क्लास मध्ये. मी, आशुतोष, दिनेश, शांतनू आणि सुचेता भुमितीची प्रमेय, भौतिशास्त्रातील गणितं, रसायशास्त्रातील समीकरण, त्रिकोन्मितीतील कठीण उदाहरणं झपाटल्यासारखे सोडवत होतो. नवीन नवीन कठीण गणितं शोधून काढायची आणि सरांचा आणि सर्वांचा डोक्याचा भुसा करायचा. पण हे सुद्धा सगळे व्यवहार सरांमर्फतच. दोन वकील कसे मिलॉर्ड मीलॉर्ड करत जज कडे तोंड करून एकमेकांना आपले आपले विचार व्यक्त करतात तसं.
खरी ओळख झाली जेव्हा ११ वी पास झाल्यावर पेंढारकर सराकडे पेढे द्यायला गेलो तेंव्हा सर स्वतः मला व दिनेशला सुचेता कडे घेऊन गेले. आम्ही एकमेकांना परिक्षेतल्या यशावर शुभेच्छा दिल्या. ही सुचेता आजवर पाहिलेल्या सुचेता पेक्षा किती वेगळी होती. अगत्याने बोलणारी. मोकळेपणाने वागणारी. येत जा रे केव्हाही म्हणाली. १९७५ ते १९८० आम्ही किती वेळा घरी गेलो, किती गप्पा केल्या याची यादी आता वाचत नाही. मी दिनेश आशुतोष सुचेता यांचा सुचेतचया घरी अड्डा असे. ताई म्हणजे स्मिता, सुचेताची मोठी बहीण पण कधी कधी गप्पामध्ये सहभागी व्हायची.
१९८० नंतर मी नोकरी निमित्त इंदोर ला स्थानांतरित झालो. व्यस्त राहिलो. भेटी गाठी कमी झाल्या. ऊठसूठ गप्पा मारायला तेव्हा मोबाईल फोन नव्हते. वर्षांहून वर्ष जात राहिले. सुचेता आणि आशुतोष स्नेहबंधनात विवाहबद्ध झाले. मध्यंतरात माझेही लग्न झाले. मुलं झाले. सांसारिक जबाबदाऱ्या वाढत गेल्या. मनात नसूनही संपर्क क्षीण होत गेले.
दुसरा माईल स्टोन आला सन २००० मध्ये. नोकरी निमित्त मी नागपूरला (बुटीबोरी) आलो आणि जुनी विस्मृतीची जळमत सगळी उडून गेली. नागपूरला आलो कळल्यावर सुचेता नी आवर्जून भेट घेतली. मधली गेलेली पोकळी नव्यानं भरून निघाली. आता सगळे फॅमिली वाले. वैयक्तिक मैत्री आता कौटुंबिक मैत्रीत रूपांतरित झाली. नागपूरला गेलंकी अद्वैत माधवी (मुलगा सून) तन्वी तानाया सर्वांबरोबर ओळखी झाल्या. एकच वर्षात नव्या नोकरीमुळे आम्ही पुन्हा गुजरातला गेलो. पण मी, मेघा, आशुतोष सुचेता याचे बंध अतामात्र इतके घट्ट विणल्या गेले ते नंतर कधीच सैल पडले नाहीत. जेव्हा जेव्हा पुनः नागपूरला गेलो सुचेता आशू कडेच उतरलो. ती पण आमच्या घरी हौसेने येत गेली. हक्काने माहेरपण भोगून गेली. सहलीवर पण गेलो. दिल्लीला स्नेहा सिद्धेश (मुलगी जावई) यांच्या पण भेटी झाल्या.
सुचेता च्या आवडत्या छंदा बद्दल सांगायचे तर तिला हस्तकला, चित्रकला, बागवानी, पाककला, गाणे ऐकणे आणि गुणगुणने असे नानाविध प्रकारचे आणि तत्सम. तिच्या घरचा बहरलेला बगीचा, घरात ठेवलेले निरनिराळे शो पीसेस तिच्या आवडीची साक्ष देतात.
आपल्या सर्वामध्ये सर्वप्रथम आजी बनण्याचा बहुमान तिच्याच नावावर अंकित आहे. असो. लिखाण खूप लांबले. आपल्या जीवनात एक वेगळे स्थान बनवणाऱ्या व्यक्तींबद्दल बोलणं हा विषयच असा की कितीही लीहले तरी समाधान होत नाही. पुन्हा एकदा सुचेता आणि आशुतोष दोघांना खूप खूप शुभेच्छा. सुचेता आणि आशुतोष यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना मी आणि मेघानी या प्रसंगी गीतबद्ध करण्याचा एक प्रयोग केला आहे तेवढं कामं करून आपले पाल्हाळ आटोपते घेतो.
हितेन्द्र खुपच छान लिहीलस, पण तरी बरचस लिहायच राहुन गेल अस तुला वाटत असेल. नरेन्द्र नी एक उदाहरण दिलेल आहेच असो, मीही एक दोन दिवसात लिहेन. अभी ना जाओ हे माझ्याकडे अलेक्सा च झोपायला जाण्याआधीच routine. आता त्या गाण्यांवर आशुतोष सुचेताचा हक्क मान्य. Group DP is quite creative, I have a very special liking for this particular group DP. विश्वास
Hitendra, superb!! I will do my bit tomorrow but in the meantime I would respectfully point out one omission in the hobbies listed in the first photo- “khane” for Ashutosh aani “khilawane” for Sucheta. नरेंद्र
![]() |
![]() |
|||||
![]() |
![]() |
|||||
![]() |
![]() |
![]() |
||||
मुझे है ये आशा देती है दिलासा
आयेंगी बहारें जाएंगी खिजा
जिनकें इरादे और उमंगें है जवा
हसी खुषी की तुषार फैलाने यहा
जब सुचेता – अशुतोष सितारे जहा
पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाही त्यांना वाचावंच लागत शाम आकांत
विश्वास, उजव्या कोपऱ्यात वर तुझे वडील पण दिसताहेत डीपी मध्ये हितेंद्र
आपल्या बॅचमधल हे बहुधा एकमेव लग्न माझ्या वडिलांनी लावल .. हेच यशस्वी संसाराच रहस्य.. इती आशु😂
विश्वास
इतकं टिकाऊ लग्नं लावताना पाहून बाकीच्यांनी बहुतेक रिस्क घेतलीच नसावी 😃😃😃😃 हितेंद्र
चुकच झाली त्यांची 😀. Thank God Sucheta is not in group
Don’t forward this message to her else त्यांना परत याव लागेल 😊 आशुतोष
Dear Ashu and Sucheta,
A lovely couple always caring for friends and trying to add new buds to their friendship plant. Both are very cordial and generous, l remember when ashu gifted a huge number of tea mugs to the tea tapariwala at laxminagar square where he would enjoy alubonda and tea with his friends. We wish them a healthy and peaceful life ahead. 💐💐💐 Sanjay & Sangita Girdhar
![]() |
With Ashutosh at Tadoba resorts- Sanjay |
मित्रा तुझ्या मैत्रीच्या नशेत..एवढा प्रभावी झालो कि शब्द ही निशब्द झाले..!
बस एवढीच् कामना कि असेच बहरत राहो…
भावनांना समजून घेणारा ह्या विठ्ठल-रुखमाई ला शतशः हा प्रणाम व शुभेच्छा… सदिच्छा….🙏 अनिल इंगोले
Star of the week cha aaj week end.Dukkhad ghatne mule काही मनोगत व्यक्त करायचे लांबणीवर पडले .आशु व sucheta baddal काही बोलायचे राहिले असेल असे वाटत nahi तरीही बोलावे तितके थोडेच aahe.(ही खोटी स्तुती sumne nahit)याच कारणास्तव mi सहज माझ्या पत्नीला extemporaneous काही bol असे सांगितले, te रेकॉर्डिंग post karit aahe.🙏 मिलिंद सोमण
![]() |
![]() |
मित्रांनो, माझ्यामते ह्या आठवड्याचे स्टार म्हणुन आशुतोष व सौ. सुचेताची झालेली निवड अगदी योग्य आहे. खरे तर माझी व आशुतोषची ओळख/आठवण म्हणजे त्याचे खो खो मधील नैपुण्य. विलक्षण चपळाईने व चातुर्याने सलग ९ मिनिटे मैदान लढविणाऱ्या आशुतोष ची प्रतिमा अजूनही मनात घट्ट रुजलेली आहे.
पण त्याची खरी ओळख झाली ती सन २००१ च्या आपल्या बॅचच्या एकत्रीकरणा नंतर. ह्या उपक्रमासाठी त्याने घेतलेल्या पुढाकारामुळे व प्रयत्नांमुळे त्याचे खूप कौतुक वाटले. ह्या कार्यक्रमानंतर झालेल्या आमच्या भेटींमध्ये मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्याची विनयशीलता व माणसे जोडून ती टिकवण्याची हातोटी. किंबहुना हेच त्याच्या व्यावसायिक यशाचे प्रमुख कारण असावे असे मला वाटते. आपला हा ग्रुप स्थापन करणे, त्यातील प्रत्येक मित्राशी संपर्क साधुन जोडणे, त्यास बोलतं करणे, वेळप्रसंगी त्याचे कौतुक करणे इ. गुणांमुळे तो लोकप्रिय न झाला तरच नवल..
आशुतोषच्या ह्या यशस्वी प्रवासात त्याला सौ. सुचेताची भक्कम साथ आहे. तिला बागकाम, हस्तकला, नक्षीकाम इ.ची आवड असल्याची साक्ष त्यांच्याकडील सदैव फुललेला बगीचा व ‘Clay Clan’ मधील सुंदर नक्षीकाम केलेल्या वस्तु आहेत.. आशुतोष व सौ. सुचेता तुम्हाला अनेक हार्दिक शुभेच्छा तसेच तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आनंदी व निरामय जीवन लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना…💐💐 अविनाश दाणी
I fully agree what Avinash has said Ashutosh is calalyst in formation of group, bringing all batchmate in one platform supported by Raju. So humble, kind to every one ,helping nature, synergitic /philanthropy work for society, generosity is admirable V r refreshing our school memories due to Ashutosh
Sincere blessing and wishes to Ashutosh and Sucheta for their long healthy ,jolly life
Looking at your mesmerizing post feel good Light chat by Sushya .melody song from Raju ,Milind and expert comments from Vishwas make mood refreshing
Keep the same tempo moving…… Shrikant Sagdeo
Congrats to Ashu and Sucheta for being rightly selected as stars of this week,and thanks to Hitendra for that. All our friends have already shared almost all that they know,experiences etc,so I will not have much addition to that. I didn’t have much interaction with Ashu since we parted after 11th,till the formation of this gp except a few meets, one being a dinner with beer at wadi initiated n hosted by ashu joined by Rajiv parkhi n dhanya.I had an opportunity on few occassions to witness ashu n Sucheta playing kho kho matches on ramdaspeth ground. All friends have given a complete sober impression of ashu,so would like to share his naughty ones.He was generally calm ,quiet in class but all this above table.Being sitting next to him,I think in 8th n 9 th ,witnessed his under the table activities like chimte kadhne,gudgulya karne throughout.I hv rememberances of some good time spent with him during navegaon trip.Rest all is said well by muley sir,datala taar,kanala katrya, . Although,very less time spent since 1975 till this gp formation,share an excellent chemistry n total openness.Like our friends shared,I too heard of ashu’s ever readiness to help needy people. Khana, khilane ka shaukin,experienced on his previous birthday at his home.He is an encyclopedia of foods,which place famous for what.Great going ashu.Since ,11th ,I must have seen Sucheta for the first time on ashu’s previous birthday.During school days my observation about her was a studious,sports person ,always ready with homework.In those days topo technology (copying from work of studious ones) was not developed or known, otherwise all would hv been Q ing up to her to copy.Now,when I saw her was an entrepreneur,with hobbies like gardening,high qlty artwork etc.I wish ashu should tell us how he managed to convince or pataoed Sucheta despite very conservative atm n surrounding we had,which kabootar he used etc. Great fun n going with you both ashu and Sucheta.God blessed you with a nice family,keep going on ,our best wishes will always be with you. Sushil Deshmukh
आपल्या ११वी च्या वर्गासाठी मी तसा उशिराच सामिल झालो व एकमेकांना ओळखू लागेपर्यंत परिक्षा पण संपली. तथापि त्या दीड पावणेदोन वर्षात ज्या काही संस्मरणीय गोष्टी व आठवणी आहेत त्या मुख्यत्वेकरून आशुतोष, कुमार घाटे व दिनेश ह्यांच्या बद्दलच्या आहेत. पैकी दिनेश/कुमार बद्दल नंतर कधीतरी.
अकरावी च्या वर्षी मी आशुतोष च्या घरासमोर च माझ्या आत्याच्या घरी रहात होतो. काही दिवसांनी थोडी बोलण्यापर्यंत ओळख वाढली. मग शाळेत एकत्र जाऊ लागलो. पुष्कळदा त्याचा लहान भाऊ (सुमंत) पण सोबत असे. तो ह्याला आवर्जून “दादू” अशीच हाक मारत असे. आशुतोष ची डाव्या हाताने कपाळावर आलेले केस वारंवार नीट करण्याची सवय नंतर पण भेटींमध्ये कायम असल्याचे बघून बरेच वाटले.
आशुतोष लक्षात राहिला तो मदतीला केव्हाही तत्परतेने येणारा म्हणून. ११वी च्या परिक्षेच्या ५/६ दिवस आधी मी गालगुंड व खूप तापाने आजारी झालो. तेव्हा काँग्रेस नगर मधील डॉ. ऊषा थत्ते ह्यांची ट्रीटमेंट घेतली तर झटकन बरे होता येईल हे त्यानेच सुचवले. त्यामुळे मी त्या वर्षी परिक्षा देऊ शकलो. ११ वी साठी बहुतेक शंकर नगर ची सरस्वती हायस्कूल हे सेंटर होते. तेव्हा सायकल ने जाण्यायेण्याचे श्रम होऊ नयेत म्हणून तो मला त्याच्या सोबत कारने घेऊन जात होता. भरीस भर त्यातच एक दिवस मी परिक्षेचे तिकीट विसरून गेलो होतो. तेव्हा गाडी च्या ड्रायव्हर ला परिस्थिती चे महत्व समजावून सांगून तो थांबला नाही तर आम्ही परत येईपर्यंत तो काळजी ने बाहेरच थांबून राहिला होता. ११वी नंतर आपल्या वाटा अनेक दिशेने गेल्या. त्या परत एकत्र जोडण्याचे अवघड काम आपल्या पैकी काही जणांनी सहजपणे पेलले. जरी मला तेव्हा यायला जमले नव्हते तरी एकमेकांची ख्यालीखुशाली कळून छान वाटले होते.
२००७ मधे रिलायन्स मध्ये नोकरीत असताना मला नागपूर येथे पोस्ट करण्यात आले. जरी हा निर्णय अंमलात आला नाही, तरी त्या वेळी सुचेता व आशुतोष बर्याच वर्षांनी (शाळा सोडल्यावर पहिल्यांदा) समक्ष भेटले. तेव्हाच धनंजय परांडेची भेट झाली. त्या वेळचे काही फोटो पण आहेत.
मागील वर्षी , just before lockdown, आम्ही ५/६ जण गोल्फ क्लब ला भेटून धमाल केली. त्या निमित्ताने आशुतोष घरी पण आला, तथापि एकटाच. सुचेता सोबत असती तर छान च झाले असते. We look forward to receive the lovely couple at our place once this terrible pandemic is behind all of us. 🌹हार्दिक शुभेच्छा सुचेता व आशुतोष🌹 संजय माणकीकर , पुणे
Sanjay Mankikar You had mentioned दादु while writing during my star week . It has its own story. दादु हे sticker माझ्या मानगुटीवर डकवून त्याला प्रसिद्ध करण्याचे काम अविनाश व चारू मुजुमदारने केले होते. I leave it to them to tell the story part Ashutosh
Aashu,
There are many noteworthy aspects of Ashu. As a sportsman, kind hearted person, true fooddy, encyclopedia of food joints in all cities, epic traveller, witty and loving friend +++. (Sorry, पुणेकर ह्या पेक्षा जास्ती स्तुती करत नाहीत)
What I am most impressed is his initiative and persistence to keep our flock together and smiling. It is appropriate to discuss this on Pamya’s birthday as it was his initiative forming this group. (अर्थात त्याच्या ह्या ग्रुप बद्दल च्या कल्पना / शिस्त अमलात येऊ शकल्या नाहीत. 😂 बहुतेक त्याची अवस्था आता वाया गेलेल्या पोरांच्या बापा सारखी झाली आहे).
Almost everyone had forgotten our common connection, also even after invited in the group many are keeping (social ?😟) distance and few even parted citing some trivial reason. With this kind of bonding, I must admire the herculean task to keep this group active. If it is leadership skill, it is never taught in any school. Hats off Ashutosh for keeping us together.
This group is a chance for all of us to refine and reinvent old bondings. Opportunity to forget bad memories, clear the misunderstandings, forget past mistakes and throw off the burden that complicates. Thanks Pamya and Ashu for giving us this opportunity. I am little more happy today and you are the reason for the same. मैं अगर खुश हूं तो कुछ एहसान तुम्हारा है ! आत्ता येवढ पुरे Other aspects sometime later Vishwas
![]() |
![]() |
हडसच्या group वर हितेन्द्रनी आशुतोषच व माझ नाव Twin stars of the week म्हणून suggest केलं होत. तुम्ही सगळ्यांनी भरभरून लिहिल.पण मी हितेन्द्रला सांगितलं होत की तू फक्त आशुतोषचच नाव suggest कर.ह्याच मुख्य कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे.आपण शाळेत असतांना मुल मुली एकमेकांशी बोलतही नव्हते त्यामुळे माझ्याबद्दल काही माहिती किंवा आठवणी असायचा संबंधच नव्हता.खर तर आशुतोषबद्दल एक नवरा म्हणून नाही तर एक चांगला मित्र म्हणून लिहायला मला पण आवडेल.
तो एक अतिशय हळवा व निर्मळ मनाचा आहे.माणस जोडण्याची त्याची हातोटी अगदी वाखाणण्यासारखी आहे.एखाद्या अनोळखी व्यक्तिला पण तो थोड्या वेळातच आपलस करतो.काही लोकांचा पुस्तकसंग्रह असतो तसा ह्याचा माणसांचा संग्रह खूप मोठा आहे.विचार करतांना एक गोष्ट प्रकर्षानी जाणवते ती म्हणजे तो कुठलेही छक्केपंजे न ठेवता अगदी मनापासून लोकांना मदत करतो तेही irrespective caste creed & religion तुम्हाला वाटेल की ही नव-याच गुणगान करते आहे पण मी पण गेली चाळीस वर्ष त्याच्याबरोबर आहे तेव्हा काही गोष्टी शेअर करायची मला आज संधी मिळाली.
तो अनेकांना अडी अडचणीच्या काळात आर्थिक मदत करतो हे कित्येकदा घरी आम्हाला माहितही नसत.वाईट ह्या गोष्टीच अजिबातच नाही पण मी त्याला म्हणते की तू जर हे मुलांना सांगितल तर ते पण तुझ अनुकरण करतील न! त्याला लोकांना जेऊ खाऊ घालायची खूप हौस.दरवर्षी माझ्याकडून भाजीच लोणच करून घेतो व आपल्या प्रियजनांना वाटप करतो व संपल्यावर रिफिलपण आहे हं असही आवर्जून सांगतो.माझ्या सासुबाई मला नेहमी म्हणतात तो ढीग सांगेल पण तू कशाला करते?म्हटल अहो त्याला आनंद मिळतो नं तेवढाच माझा हातभार लागतो.
सुशीलनी विचारल की तुमच कस जमल?ह्या प्रश्नाच उत्तर आम्हालाच अजून सापडल नाही.कदाचित उपरवाल्याची तशी ईच्छा असेल.पण हे घडवून आणण्यात माझे सासरे म्हणजे दादा चितळे ह्यांचा मोठा सहभाग होता.
आशुतोषला त्यांच्याकडूनच बाळकडू मिळाल आहे.कोणाबद्दल एकदम मत बनवायच नाही.नाण्याला दोन बाजू असतात तर आधी दुसरी बाजूपण समजून घ्या अस ते नेहमीच सांगायचे.त्यामुळे तसाच विचार करायची मला पण सवय लागली.आजपर्यंत नातिचरामि च आचरण केलं त्यामुळे आमचा संसार उत्तम सुरू आहे.
मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे कुठल्याही चांगल्या नात्याचा गाभा म्हणजे विश्वास असतो.सहवासानी माणूस उलगडत जातो.कोणतही नात मग ते नवरा बायकोच असो किंवा मैत्रीच त्यात कधीही Ego येता कामा नये.चूक झाली तर ती मोकळेपणानी कबूल करता आली पाहिजे व समोरच्या व्यक्तिलापण मोठेपणानी माफ करता आल पाहिजे.ह्यासाठी मोठ मन लागत व ते आपल्या सगळ्यांकडे आहे अस मला वाटत.तर आता माझ पुराण आटोपत घेते.
हितेन्द्र,संजय-संगीता गिरधर अविनाश,शाम,श्रीकांत, सुशील ,अनिल, विश्वास ,नरेन्द्र ,संजय माणकीकर तुम्ही सगळ्यांनी आमच जे भरभरून कौतुक केल त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते.खर तर ह्या कौतुकाचा धनी एकमेव आशुतोषच आहे.माझ म्हणजे घोड्याबरोबर नाल्याची यात्रा तद्वतच आहे.मला त्याच्या प्रत्येक कार्यात जितका हातभार लावता येतो तेवढा लावायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.मी प्रत्यक्ष जरी तुम्हा सगळ्यांना भेटू शकले नाही तरी आशुतोषकडून तुमची ख्याली खुशाली कळतच होती.आता हे कोरोनाच संकट गेल्यावर आपण जमेल तेवढ्या मित्रांनी आमच्याकडे भेटुया. सुचेता चितळे nee भालेराव
Ashu, now it’s your turn to reciprocate Hitendra
Hitendra Stand by for …… in your language
She is executive member of National party, I am only party worker at Panchayat level
Ashutosh
Sucheta, Both your posts today are masterpieces of your knack of expressing your mind and command on words. 👌👌 मंडळ आभारी आहे !! 🙏 विश्वास विद्वंस
Sucheta, True humbleness /unpretentious you both 🙏 Shrikant Sagdeo
सुचेता, Great to see your Nibandh lekhan skills are in tact. 🙏🙏 नरेंद्र देशपांडे Detroit
मित्रांनो म्हणतात ना आधा हकीम खतरे जान अशीच माझी अवस्था आहे. हितेंद्रसारख ना सुरेख गद्य लिहता येत ना दिनेशसारख थोडक्यात पद्य तरीपण तुम्हा सर्वांचे आभार मानण्यापेक्षा तुमच्या प्रेमाची परतफेड करण्याचा हा प्रयत्न.
सर्वप्रथम तुम्हा सर्वांचेच (A to Z ) मनापासून धन्यवाद
तुम्ही मला जी स्तुतीपर विशेषण जोडलीत त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत नाही कारण whatever little I do is what I owe to the society where I am spending my day to day life – it is drop in the ocean Moreover there are so many people around contributing financially & physically in adverse conditions so why should I not do it when God has given me enough to share असो –
गोरी बायको पाहिजे- सुस्वभावी – हुशार etc अशी जाहिरात न देताच मला हिरा सापडला in form of Sucheta – She is my best friend first then बायको. माझ्या जीवनाला वळण लावण्यात तिचा मोलाचा वाटा आहे .
मला सर्वप्रथम जाणवले ते अदृश्य मित्रांचे प्रेम (those not appearing in group) but having their presence by reading messages instantly -fastest finger first Sunil Khamgaonkar. It speaks about their involvement with all of us.
Vishwas they certainly are not वाया गेलेली पोर, मला वाटत आपण बिघडलेले बाप आहोत कि काय 😀😀 I look at this weekly star … series as a forum to share nostalgic memories of classmates Everyone should post whatever is their in their पोतडी even if there is only one for that matter.
मनमिळाऊ Hitendra , गुलाबभाऊ संजय, कधीही न चुकतां वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा अनिल, Dusterking Avinash, our captain/ boss Ramanujam (Pamya) बहुश्रूत नरेंद्र, संजय दादु, Invisible Dhananjay, Fastest F F – Sunil, गुगलबाबा विश्वास, Shrikant (Nigerian म्हणु का? 😊 बालगंधर्व राजीव – यमनकिंग, Jungle king Milind, कविवर्य दिनेश, मुरलीधर शाम, लांबपल्याची चोट मारणारा Tilya, धक्का नको लागायला फेम अजित, Industrialist Charu Muzumdar, संघदक्ष मोहन तोरसेकर + everyone not mentioned ( sorry not to name them. Last but not least Vibrant Sushya…..तुम्हा सर्वांनी व्यक्त केलेले प्रेम व भावनांची परतफेड शब्दात कटिबद्ध करणे मला जरा कठिणच जात आहे .१९७५ ते आजपर्यंत लाभलेला जिव्हाळा असाच टिकुन राहो ही देवापुढे प्रार्थना. (मी जरी नास्तिक असलो तरी ) लिहिण्यासारख बरेच आहे but I need to stick up to my reputation of not scoring more than 60% marks 😀+ पुढेजाऊन groupमधे मला तुम्हाला छळायचे आहेच या विचारानी आटपत घेतो .
* नास्तिक .. I strongly believe in following things
- There is some power which basically governs us-God Jesus Allah whatever u may say
- Nothing is in our hands – everything is destined
- Whatever happens it happens for the good only
पुन:श्च सर्वांचे आभार🙏ज्यांचे आभार खर तर मी सुरवातीलाच मानायला हवे होते ते शेवट गोड करी रे या विचारानी करतो . धन्य ते मातापिता ज्यांनी सुचेताला जन्म दिला . (नरेंद्र) आमच्या गाठी इथेच बांधल्या गेल्या आणि तिच्यामुळेच माझे जीवन सुकर झाले 🌷🌹
आशुतोष
AHSUTOSH
Lost in vortex of mundane routine, I was quite off the stream.
Thanks, Ashutosh! To navigate me to the bank of HHS:XI-75 team.
Honest, transparent, caring and sharing, affluent yet grounded.
Selfless Service and humility make your personality all rounded. . . . . . . . . . . . . . . . . . .
(Many more emotions and experiences-but no words to define- Bear with me, close your eyes and interpret the dotted line.)
For the batch at large; specially our GOLDEN QUADRILATERAL.
You are like the center of gravity-both metaphorically and literal.
Explorer of places and different food joints, you are a fantastic host.
For your health, happiness, and ageless heartiness- I raise this toast.
SUCHETA
Whenever the going is tough, morale is low, and the tide is difficult to ride-
You are just a call away, standing by me- like a Friend, Philosopher and Guide.
More conversed, more I discovered always about the multitude of your facets.
A-artistic, B-balanced, C-courteous, D-disciplined…Z-zealous: thus, go alphabets.
Engrossed in multiple things, how all those hobbies, still you could nurture?
And spare time too for the youngers, to make them imbibe, our great culture?
The pair of words ‘satisfied successful’ is another oxymoron- I always thought-
You proved me wrong, when I talked to you, with different insights you brought!
ASHUTOSH – SUCHETA and FAMILY (शार्दुलविक्रीडित)
सौख्ये उत्तम, आशुतोष!पुढती, लाभो, सुचेता-सवी!।
राहो देवकृपा तुम्हावर सदा अद्वैत नी माधवी।।
आशिर्वाद तुम्हा-सदा यश मिळो- स्नेहाच सिद्धेश व।
संस्कारी तनवी तशीच तनया! दोघी यशस्वी भव।।
दिनेश भृशुंडी
Wow a loaded and eventful evening? At first, I was trying to decode the post by Dinesh and while I was just halfway through (कसमसे.. it is not covered in google education system) there came two heavy posts from Ashutosh.
Normally Ashutosh is writing simple posts easy for my level, but today he too… being star of the week he is excused anyway. Meanwhile, I am stuck up with the meaning of google baba, even google can’t help me, but I promise will continue with my efforts.
Meanwhile before I miss let me pass on a special compliment to Sucheta “she is an accomplished mother-in-law”. I am only messenger so don’t ask me any query. Ashutosh and Sucheta there are many things to write.. will take another chance someday. As of now, wishing you a happy and eventful life. May you be always surrounded in the company of lovely/ loving family and friends. May you celebrate your every dream and every accomplishment. Vishwas
आठवणीं भरपूर, त्यांचा पूर सर्वदूर
देऊन साजरे रूप, आशुतोष तुझी अभिव्यक्ती, छान खरचंच खूप दिनेश भृशुंडी
Great people always express in modest way live example Ashu👍 Shrikant Sagdeo
Dear Ashu, Many many thanks from my heart for giving me an appropriate adjective. After a long gap, I heard the magical words. Coming soon at Nagpur permanently & waiting for your lovely company. Jayendra मोटघरे
तुझ्या मनमिळाऊ.. दिलखुलास.. मोठेपणा… दिलदार व्यक्तिमत्त्वाला शतशः प्रणाम……🙏🙏
अनिल इंगोले
Detroit २६/४/२१
ह्या आठवड्याचा स्टार द्वयांसाठी मनोगत व्यक्त करण्यास थोडासा विलंब झाला त्याचे खरे कारण म्हणजे आशुतोषच 😀 गेली कित्येक वर्ष नागपूरच्या भेटीत चितळे सदनाची भेट न चुकता होत असते पण वेळेवर पोहचण्याची वाईट खोड मला असल्यामुळे बरेचदा अरे नागपुरात असताना नागपुरकरांसारखा वागत जा असा प्रेमळ सल्ला कधीकधी आशुतोषकडुन मिळत असतो. तेंव्हा कधीतरी ही इच्छा पूर्ण करावी ह्या हेतुने हे प्रशंसा पत्र late Latif बनून पाठवत आहे
आपण शाळासोडल्यावर पुढच्या वाटचालीच्या दिशा वेगळ्या झाल्या. ब-याच वर्षांनंतर म्हणजे २००० डिसेंबरच्या तिस-या आठवड्यात अचानक आशुतोष घरी आला. त्याला तब्बल २५ वर्षानंतर भेटत होतो. त्याचवेळी आपण शाळेतल्या मित्रमैत्रिणींचे संमेलन करण्याचा प्रस्ताव आम्ही २-० मतांनी पास केला. त्याआधी पुण्याला असताना तात्याने आशुतोष व सुचेता लग्न करणार आहेत ही बातमी दिली होती. तर हे कसे झाले ह्याचा खुलासा आशुतोषने त्या कार्यक्रमात खालिल प्रमाणे दिला – “सुचेताने “kho “ म्हटले व आशुतोषने “ Ho “ ऐकले . अर्थात जन्माच्या गाठी बांधल्या गेल्या स्वर्गात , खोखोच्या मैदानात दृढ झाल्या.”
त्यानंतर आजतागायत आपल्या अगत्यपूर्ण वागणुकीमुळे आमच्या लेकी आणि सौ ह्यांनादेखील आपलेसे केले. मुलींनादेखील हक्काने पाणीपुरी व दही बटाटापुरी ( कोथिंबीर घालुन ) खाऊ घालणारी सुचेता आत्या आहे की मावशी असा प्रश्न पडत असे.
आशुतोषने आयुष्यात अनेक लोकांना निस्पृह भावनेने मदत केली हे आपल्याला ठाऊक आहे पण अगदी अनोळखी व्यक्तीला मागचा पुढचा विचार न करता मदतीला हात पुढे करण्याची वृत्ती असलेली एकच व्यक्ती माझ्या माहितीत म्हणजे आपला परममित्र आशुतोष .
एकदा आशुतोष कलकत्ता विमानतळावर असताना एका व्यक्तीला तातडीने विमानाने आॅपरेशनसाठी नागपुरला जायचे होते. विमानतळावर आल्यानंतर त्या व्यक्तिला व सोबतच्या व्यक्तिजवळ पुरेसे पैसे नसल्याचे लक्षात आले . काऊंटर जवळच उभ्या असलेल्या आशुतोषला त्यांची घालमेल लक्षात आली . त्याने लगेच त्यांना हवी असलेली रक्कम देऊन त्यांचे तिकीट काढुन प्रवासाचा मार्ग मोकळा केला व त्यामुळे योग्य वेळात उपचार होऊन तो बरा झाला.
नागपुरला गेलो की अद्वैत नेहमी म्हणतो की तुम्ही एकमेकांना २ वर्षांनी भेटतां पण तुमच्या गप्पा ऐकुन असे वाटते की तुमची रोजची उठबस असते . माणसं जमविणे आणि मैत्री मजबूत करणारे Made for each other Ashutosh & Sucheta हे अापल्याला वर्ग बंधु / भगिनी म्हणुन लाभले ह्याचा फार आनंद आहे. लोभ कायम असावा ही विनंती.
ता.क – हा दोघांच्या मानाचा आठवडा असल्यामुळे मी देशस्थ – कोकणस्थ वाद टाळला हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच 😀 नरेंद्र देशपांडे USA
Narendra Deshpande Detroit USA कोब्रा वि देब्रा,
You refrained from writing during my star week so did I. But here I am back again – it is in your favour this time. एका कोकणस्थाला (न बाटवता ?) शिस्त लावण्याची किमया सुचेताने घडवली . In other words माझ्यासारख्या बेशिस्त माणसाला ( भरकटण्याची शक्यता असलेल्याला ) शिस्त / लगाम लावला 😀😀Three Cheers 🥂 for all Deshastha
Ashutosh
आशुतोष, आजचे स्टार शी संबंधित जेवढे सन्देश येतील ते सुचेता ला तू फॉरवर्ड केलेच पाहिजे. तेवढा धोका तुला आज पत्करावाच लागेल. तुम्हां दोघच नाही, प्रत्येक पती पत्नीला आपल्या दोघामध्ये कायम विश्वास ठेवलाच पाहिजे. (विश्वास विद्वांस ला हुरळून जाण्याची गरज नाही) मी विश्वास म्हणजे ट्रस्ट बद्दल बोलतो आहे.
हितेंद्र
🙏खो ss म्हणटल्यावर चपळतेने धावणारा माझा शाळेतला बालमित्र आशुतोष मला अजुनही बालपणातला तसाच डोळ्यासमोर असतो . हा अतिशय चपळतेने धावुन खो खो च्या खांबावर गडी बाद करण्यात माहीर. शालेय जिवनातच सर्व शिक्षकांशी जुळवुन घेणारा. मित्रांन मध्ये सर्वांना सामावुन घेत राहिला. पहिल्या बेंच ते शेवटचा बेंच सर्व वर्ग बंधु सोबत राहीला. मात्र ग्रुप लिडर , कँपटन अश्या ओळखी साठी नाही. आम्ही इयत्ता ११ वी उत्तीर्ण झालो , आणि बरेच सवंगडी जी.एस. काँर्मसला महाविद्यालयीन शिक्षणा करीता एकत्र आलो . आशुतोष , धनंजय , अजित , शरद , प्रदीप असा आमचा ग्रुप बनला. आशुतोषला घरी परतांना अमरावतीरोड, बर्डी , मुंजे चौक हा मार्ग सोईस्कर होता . त्यात आमचे काही शाळेतले काही सवंगडी इन्स्टिटुट आँफ सायन्सला होते , राजीव , श्याम , अविनाश . त्या निमीत्याने थोडे ऋणानुबंध स्थापित झाले असावे .
आशुतोष बि. काँम .उत्तीर्ण झाला आणि त्याच्या घरच्या वकिलीची पुस्तके छापणाऱ्या तसेच बहुतांशी एकाधिकार असणाऱ्या (ALL INDIA REPORTER ) कंपनीत रुजु झाला . त्याने त्या व्यवसायात स्वतःला झोकुन दिले . समाजातील हुषार आणि श्रीमंत असणाऱ्या वकील मंडळींना आपलेसे करुन घेतले . घरचे व्यवसाईक बाळकडु मिळालेले शिवाय वाक्चातुर्य , आणि हसतमुख व्यक्तिमत्व
कंपनीचा डोलारा व व्याप खुप वाढवला. त्यात थोरांचे पाठबळ आणि आशिर्वाद कामी आले . संपुर्ण भारत भ्रमंती व्यवसाय वाढविण्यास करावी लागली . घरापासुन दुर जाऊन घरचा ओढा मात्र कायम राहिला . अगदी “घार फिरते आकाशी , तिचे लक्ष घरट्यापाशी सारखे ” . खुप मित्र जोडल्या गेले . शिवाय परगावी असणाऱ्या शालेय जिवनातील मित्रांनकडे जाऊन ऋणानुबंध घट्ट केले .
या मित्राच्या जिवनात खो खो कायम राहीला. त्याची सहचारीणी शालेय मैत्रीण व खो खो पटुच आहे . ह्या पठ्ठ्याने खो म्हणाला आणि तिने हो ! म्हणुन होकार दिला . स्त्रीयांना जन्मताःच व्यवहार कळत असावा . ह्याच्या सहचारीणेने आशुतोषला शालेय जिवना पासुन बघितलेले . शिवाय आशुतोषचा भाउ हिच्या माहेरच्या घरा समोर असल्याने सतत लक्ष राहीले ,अगदी सामनेवाले खिडकीमें..सारखे .शिवाय आँफीस घरा जवळच . घरच्या बहुतांशी मंडळींनी बघितलेले .
आशुतोषने घरी लग्नाचा प्रस्ताव मांडल्यावर घरची मंडळी माहितीतली मुलगी शिवाय हुषार , अदबशिर म्हणुन तिचे निरीक्षण केले असावे . अश्या पद्धतीने आशुतोष विवाह बंधनात अडकला .
आज मुले मोठी झाली . मुलगा CA होऊन वडिलांन प्रमाणे घरच्या व्यवसांयात जोडला गेला . सुन सुशिक्षीत व दोन प्रेमळ नाती आजोबा , आजी मागे पिंगा घालत असतांत .
जिवनांत कुणाच्या वादळ येऊ नयेत , परंतु टाळता येणे शक्य नसावे . विधी लिखीत घडल्याने मात्र वैयक्तिक जिवन ढवळुन निघाले
मात्र अश्या बिकट प्रसंगी हा माझा मित्र मात्र खंबीर राहिला . चेहऱ्यावर कुठलाही लवलेश राहु न देता , सतत हसतमुख असतो . इतरांना त्याची कल्पनापण येऊ देत नाही . ह्याने संसार व मित्र परीवार सदैव जपला . मित्रांसाठी व इतर परीचितां करता काहीही करण्यास तयार असतो . खुप पै पैसा खर्च करतो . काही सहजतेने घेतात . हे लक्षात येऊन तो मात्र फक्त मैत्रीतील आनंद शोधत असतो .
त्याच्या धैर्यशिल , हसमुख व्यक्तिमत्वाला माझा मानाचा मुजरा . एक सच्चा मित्र आमच्या मित्र परीवाराचा .
असा आमचा मित्र सदैव आनंदी व सुखी असु दे !
हीच इश्वर चरणी प्रार्थना !
शुभं करोती म्हणा ! मुलांनो !
शुभं करोती म्हणा !
Pradeep दिवाळे





















Leave a Reply