Ravindra Saoji

Ravindra Madhusudan Saoji रवि मधुसूदन सावजी 16/05/2021

रवि सावजी माझ्याबरोबर पाचवीपासून होता. शाळकरी रवि हजरजबाबी आणि witty असल्याची माझी आठवण आहे. त्याचे सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन माझ्यापेक्षा खूप जास्त असे. त्या दृष्टीने तो एक opinion maker नक्कीच होता. शाळेत या जाणवलेल्या गुणांपेक्षा त्याचे काही मोठे गुण नंतर जाणवायला लागले. मला त्याबद्दल जास्त बोलायचे आहे.

शाळा संपली तशी आणीबाणी लागली. कॉलेजचे पहिले वर्ष चालू असताना त्याने दीपक कुलकर्णी आणि भोंबे (त्यांचा मित्र) करायचा ठरवला. त्याप्रमाणे त्यांनी घोषणा दिल्या आणि अटक करवून घेतलं. (विश्वासने देखील असेच केले होते). या दरम्यानच्या त्याच्या आठवणी मला फारशा माहीत नाहीत. पण भोम्बेला बर्फाच्या लादिवर झोपवण्याच्या धमक्या पोलिसांनी दिल्या होत्या असे काहीसे आठवते. काही महिन्यात त्यांची वर्ष वाया न जाता मुक्तता झाली.

त्यावेळी संघावर बंदी होती. पण तो आणि त्याचे मित्र बजाजनगर मैदानात volley ball खेळत असत. त्यानंतर ते नियमित नमस्ते सदा करायचे.

Graduation नंतर यथावकाश तो m.p.s.c chi परीक्षा पास होऊन महाराष्ट्रात ऑफिसर झाला. सरकारी नोकरीत राहूनही प्रामाणिकपणावर तो ठाम होता. इतरत्र ऐकलेल्या कथांनुसार राजकीय दबावापुढे तो कसा ठाम होता हे मला कळत असे. सभोवतालच्यां परिस्थितीमुळे किंवा मोकळ्या मनाने जगावे म्हणून त्याने वीस (?) वर्ष पूर्ण केल्यावर लगेच निवृत्ती घेतली.

नंतर त्याने आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. बहुतेक ठिकाणी त्याने जवळपास मुख्य जबाबदारी घेऊन काम केले आहे. काही वर्षांपूर्वी तो खेडेगावातील गरीब मुलांना व्यवसाय शिक्षण देणाऱ्या संस्थेत सहभागी होता. हल्ली तो मतिमंद मुलांना शिक्षण देणाऱ्या संस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याच्या संज्ञा या संस्थेविषयी मी स्वतंत्रपणे लिहिणार आहे.

मला वाटते की संघाचा आणि त्याचा हल्ली काही संबंध नाही. कित्येक वर्षांपासून तो रामकृष्ण मठात जात असतो. त्याची बायको मेघा ही आपल्याच शाळेतील. रवीचा निवृत्तीचा निर्णय हा तसे म्हटले तर ऐन उमेदित झाला. पण त्यास तिची साथ होती. ती हल्ली निवृत्त झाली. रवीच्या सामाजिक कार्यात तिची नेहमीच active साथ असते. दोघेही नेहमी हसतमुख असतात. त्यांचा मुलगा chartered accountant आहे आणि सून डेंटिस्ट.

शेवटी, तो मठात जाणारा आणि मी जाहीर नास्तिक. असे असूनही आम्ही ईश्वर या संकल्पनेविषयी भावनांचा संघर्ष न होता संवाद होत असतात. शाळेत असताना रवीला संगीत शिकायचे होते. माझी अशी इच्छा आहे की त्याने ते परत सुरू करावे. त्याच्या पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा!

प्रमोद सहस्त्रबुद्धे

Pramod has given good insight and will be pleasure to catch-up, inshallah. Obviously, Pramod has a special predilection as Ravindra too has charted his own life journey which is distinct than many of us.

Ravindra was staying in Gopalnagar and I was in Shradhanand peth / Pratap nagar. So we were road mates many times on way home or school. But didn’t have contact since then. Can I say this star of the week is from far away galaxy? Won’t say till we catch up.

Ravindra, I wish you, your family a safe, healthy and happy life to serve the society. 🙏🙏

Vishwas विद्वंस

Few memories of my friend Ravi Saoji. I was with him from 5th to 11th. I had been to his house in Gopal Nagar to see lotus in the small tank in his courtyard. Very nicely maintained garden.

He used to use black blue ink in those days. In high school days he used to read and discuss editorials in the News Paper. Thus more aware of current situation. A principled young man. He was in prison in emergency period for doing ‘satyagrah’. It was very difficult for him to serve in the corrupt environment of state government.

After completing pensionable service in state government, he resigned and worked and still working for non-profit social organizations. To name the few – hostel for poor students, Sandnya Sanvardhan, Hospital run by Ramkrishna Ashram.

Mohan Kundle

आपला मित्र रवि सावजीची ह्या आठवड्याचा मानकरी म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन !!!

प्रामाणिक, स्पष्टवक्ता, आपली मुल्ये जपत सामाजिक दायित्व निभवणाऱ्या रविस व त्याच्या कुटुंबीयांना भावी आयुष्य आनंदी, समाधानी व निरामय लाभो, हिच सदिच्छा..💐💐🙏

अविनाश दाणी

Congratulations Ravi ,being star of week n star for ever.Wish you and family a very healthy and prosperous life.

Sushil Deshmukh

Ravi was my neighbor in Yashwant Nagar for many years till his parents built their house in Gopal Nagar State Bank colony. Apart from all the good memories of playing kanche, bhovra, cricket, salak khupasni, football, and lapachapi, patte, bhikar savkar in summer I remember him for his good handwriting and scoring high marks in Marathi and other languages. After he moved to Gopal Nagar I remember visiting his family on many occasions eg Dasara, and rangapanchami even when he was not there as I knew his brothers Avi, Sanjiv and parents as well.

Then there was a big gap of close to 40 years till we met again in Dec 19 reunion. His unassuming nature meant that he did not mention anything about the sacrifices he has made to serve the community. Also glad to know the that his wedding anniversary falls on the same day 27th December. So wish you, vahini and family many happy years ahead.

Narendra USA

Hello Ravindra,

Happy to see you on board. Pramod made a right choice by naming you this weeks star. our interaction at school & thereafter was on & off but I was aware about your social activities & now Pramod has enlightened it further. तुझ्या विविध समाजकार्याबद्दल माझ्याकडून पाठ थोपटतो . You are great.

I wish you & Megha long & healthy life 🌷

Stay safe Take care

PS: Ravindra has good collection of cactus 🌵Must Visit to his sweet home to see it & enjoy पोहे too 😀

Ashutosh Chitaley

Ravindra, known to me as humble, quiet, sincere and noncontroversial personality. I am very much impreesed by the virtues he possesses and his contribution to society. I wish him and his family a very happy and prosperous life.

Hitendra Pande

रवींद्र सावजी!

पाचव्या वर्गापासून ते अकराव्या वर्गापर्यंत हा तसं म्हटलं तर एक लांब प्रवास पण या प्रवासात आपण दोघे, कदाचित,काहीसे, दोन रूळावर भिन्नपणे चालणाऱ्या चाकांच्या सारखे! एक गमतीदार उल्लेख म्हणजे जे काही साधर्म्य आपल्या दोघांमध्ये होते ते तुझ्या नावात रवी आहे आणि मी रवी नगर ला राहत असायचो, एवढेच!

पण हा झाला एक विनोदाचा भाग. खरंतर तू तेव्हापासूनच शांत स्वभावाचा, काहीसा रिफ्लेक्टिव ओरिएंटेशनचा, मितभाषी, आपण बरं आपलं काम बरं प्रवृत्तीचा आणी बराचसा अंतर्मुख असलेला असा मला (माझ्यासारखा) वाटायचा. म्हणुनच, दोन चाकं जे मी म्हणतोय त्याचं कारण म्हणजे जशी चाकं सारखी असतात तसेच आपले आधी नमूद केलेले हे स्वभाव गुणधर्म पण बऱ्यापैकी सारखे होते. खरंतर, सारख्या गुणधर्मामुळे आपण जवळचे मित्र होणे स्वाभाविक राहिले असते. पण माहित नाही का पण, इंटेन्स इंटरॅक्शनची किंवा क्लोज असोसिएशनची अशी वेळ फार क्वचितच आली असावी.

अजून एक – माझे बऱ्यापैकी हस्ताक्षर आणी ब्ल्यू-ब्लॅक शाईवर शिफ्टोव्हर- ही मोठ्या प्रमाणात तुझी गिफ्ट आहें. (पुढे एकताटे सरांनी ठासून, आपण त्रासून, कित्ता घासून, हस्ताक्षर अधिक तासून निघाली म्हणा.)

असो! तू या साप्ताहिक तारामंडळात चमकल्या बद्दल तुझे अभिनंदन. ‘चमकल्या’ या शब्दावर इंटेन्डेड अनुप्रास आहे. १. अंतर्भूत होणे. व २. शब्दश:, तुझ्या असामान्य कामामुळे तुझे चमकणे. यानिमित्ताने तुझ्याबद्दल वाचत गेलो आणि अजून जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत झाली एकीकडे; तर दुसरीकडे, तुझ्या बद्दलच्या अभिमानाने एक वेगळीच संवेदना मनात निर्माण झाली.

तेव्हाचा तू आणि आताचा तू माझ्या मते याच्यामध्ये भासायला जरी खूप फरक भासत असेल तरी मला वाटतं की तुझ्या डोळ्यात तेव्हाच असं काहीतरी भिन्न करायच्या मनसुब्याची एक हलकी, अस्पष्टशी चमक; आणि मनामधे एक अव्यक्त, तरलसा निर्धार असावा. पुढे तू जे काही बिल्ड केलं त्याचा एक पाया म्हणून ह्या दोन्ही गोष्टी तेव्हापासूनच रूजत होत्या, रुळत होत्या आणि रचत होत्या. पुढे ह्याला सुसंगतीची जोड व परिस्थिती प्रमाणे अनुकूल मोड तू देत राहिलास हे नक्कीच कौतुकास्पद!

मित्रा- खरंच! तू जे काही केलं आहे ते केवळ प्रशंसनीयच नाही तर निस्सदेह वंदनीय पण आहे.

नैतिकता-प्राधान्यता अंगीकारणे, त्यामुळे भौतिकता झुगारणे व सामाजिकता स्वीकारणे, किंबहुना त्याबद्दलची धाडसी निर्णयक्षमता बाळगणे- हे बऱ्याच लोकांना करावसं वाटत असेल यात शंका नाही पण करून दाखवणारे तुझ्यासारखे बोटावर मोजण्याएवढेच!

जे काही समाजकार्य करण्याचा विडा तू उचलला आहेस व त्यात तुला मेघाचे सशक्त व सक्षम पाठबळ मिळाले आहे (behind every successful person…) त्यात तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि जास्तीत जास्त गरजूंना तुमच्या उपक्रमाचा फायदा व्हावा आणि माझ्यासारख्या भौतिकतेच्या भोवऱ्यात भरकटलेल्यांना प्रेरणा मिळावी ह्या सदीच्छांसह, हे माझे छोटेसे म्हणून सुरू केले पण काहीसे जास्तच लांबत चाललेले वक्तव्य इथेच थांबवतो.

तुझे आणि मेघाचे पुनःश्च अभिनंदन व शत:श्च अभिचिंतन!

*दिनेश भृशुंडी

शाळेतून बाहेर पडल्या नंतर माझी रवीची भेट बऱ्याच वर्षांनी झाली ती पण अचानक आमच्या घरीच. माझ्या वडिलांनी पेपर ची रद्दी दान करायचं ठरवल्या नंतर कधीतरी एक दिवस मारुती व्ह्यान घेऊन खुद्द रवी सावजी दारात उभा. म्हणाला पेपर ची रद्दी न्यायला आलो. तेव्हा पहिल्यांदा ह्या नव्या रवीची ओळख झाली. तेंव्हा त्याच्या कडून त्यांच्या उपक्रमाबद्दल माहिती मिळाली आणि तो सरकारी नोकरी सोडून या प्रपंचात पडल्याचे ऐकून तर त्याला कोपरापासून दोन्हीं हात जोडले.

त्या सुरवातीच्या काळात त्याने भरपूर मेहनत केली आहे. कारण या पहिल्या भेटीनंतर सुद्धा मला तो बरेचदा भेटला – स्वतः रद्दी न्यायला. पेपर ची रद्दी जमा करून त्याची त्यांना लाखांत मदत होते हे ऐकून धक्काच बसला होता. त्यानंतर एक दोनदा आमची बुटीबोरी ला त्यांच्या संस्थेत पण भेट झाली.

या सर्व कार्यक्रमात वहिनींनी त्याला मनापासून साथ दिल्यामुळे तो एक आगळावेगळा उपक्रम करण्यात यशस्वी झाला आहे. या त्याच्या उपक्रमा बद्दल खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

यापुढेही असेच उत्तम कार्य करत राहो हीच सदिच्छा. खरं तर यात मी देखील काही मदत करू शकत असल्यास त्याने जरूर सांगावे. मी एका Masonic Lodge चा सध्या head आहे आणि charity हा आमचा प्रमुख उद्देश आहे. तेंव्हा माझ्याकडुन काही मदत होऊ शकत असेल तर मला नक्कीच आवडेल.

राजीव पारखी

दिनेश ,

तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. मी बराचसा अंतर्मुख होतो. ( आजही आहेच.), आणि तू म्हणालास तशी आपली क्लोज असोसिएशनची वेळ फारशी आलीच नाही, ( “फर्थ इंडियात” मात्र आपण काही काळ सोबत काम केलं आहे.) हेही तेवढेच खरे ! मात्र तुझे चांगले हस्ताक्षर ही माझी गिफ्ट आहे, हे माझ्यासाठी आश्चर्यच ! ….असो…..

तू अत्यंत तरल आणि ओघवत्या भाषेत माझे व्यक्तिचित्रण ( ? ) करतांना व्यक्त केलेल्या भावनांबद्दल अंतःकरणापासून धन्यवाद ! ..🙏

रवींद्र सावजी

Dear Ravindra, First of all congratulations to you for being deservedly announced star of the week.So far my memory goes,we knew well to each other but hardly had much interaction during school days n hence I missed your macro credentials then.But I was regularly being reminded of you since the time saoji preparations were added to public taste in nagpur.But now,thanks to all friends who hv braught up your excellent past n respectfull current which undoubtedly puts you at top esp due to your selfless social work the karma.I wish you and your family a very healthy n happy future life.Hope to see you soon

Sushil Deshmukh

Thanks Sushil .Really thankful for your compliments.

Ravindra

Ravindra

It was interesting week. I would say U mAde Dinesh to write essay. Hope it encourages you and Shrinivas to participate more & not end up saying प्रयत्न करतो

I am sure you must have missed YOUR close friend DA so also like we all lovable Prithviraj. Try to rope in DA again when situation gets normal

Ashutosh

Really it was an interesting week. I did not expect that I would be made star of the week so early as I was not at all active in the group. It is all because of u and Pramod. Thanks for that. I am really thankful to all of u for praise & compliments showered on me.

As u rightly said I certainly missed Pritviraj ! A gem of a person ! I have deep memories of him.

Regarding Dipya (D A), presently going through a lean patch, will be active soon. So friends thanks once again & welcome new star of the week ‘MohanKundle ‘.

Ravindra Saoji

I agree Ashu, it was very memorable week, and surprisingly so when star is introvert.

“Star of the week” concept has given everyone of us a chance to understand, appreciate each other and to reconnect with the new evolved person. I hope others shall also participate and enjoy.

Vishwas Vidwans

Dinesh

Appreciation is the last infirmity of noble mind. Very few people do it – you are the one – beautifully expressed your thoughts straight from heart 👍🙏

Ashutosh

एकदा रवी एस बी आय बुटीबोरी शाखेत संस्थेच्या कामानिमित्त आला होता तेव्हा भेट झाली व सामाजिक कार्यात त्याच्या योगदानाची माहिती मिळाली

अभिवादन शिलस्य

नित्यं मतिमंद बालक बालिका सेविनः

चत्वारि तस्य वर्धन्ते

आयुर्विद्या यशो बलम्

शाम आकांत

सुप्रभात !

सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार, 🙏यासाठी कि,तुम्ही मला ” Star of the week ” चा सन्मान दिलात ! खरंतर मी या ग्रुपवर अगदीच निष्क्रिय ! त्यामुळे जे या ग्रुपवर सक्रीय आहेत त्यांना हा सन्मान आधी मिळावयास हवा होता. क्रमाने तो माझ्यापर्यंत आलाच असता. पण प्रमोद ऐकायलाच तयार नाही ! त्यानंतर आशुतोषचा फोन, त्यालाही मी हेच म्हटले. त्यावर त्याचा झपकन आत घुसणारा ‘inswing’ …”तुला सक्रिय करण्यासाठीच..” Star of the week” करतोय. आणि मी अर्थातच ‘clean bold’ ! ….असो..

सुप्रसिद्ध नाट्यकलावंत प्रभाकर पणशीकर (यांच्या अनेक गाजलेल्या नाटकांपैकी एक आहे “तो मी नव्हेच “) यांच आत्मचरित्र आहे,”तोच मी” !…तुम्ही सर्वांनी केलेला माझा गुणगौरव वाचून मला मात्र प्रश्न पडलाय “हाच मी ?”🤔. प्रमोद, विश्वास, अवी ,मोहन, सुशील, नरेंद्र, हितेंद्र, दिनेश, अनिल, आशुतोष तुम्ही सर्वांनी माझा जो ‘गुणगौरव ‘ केलाय त्याबद्दल तुमचे आणि बाकी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🙏

प्रमोदचे विशेष आभार, माझे नांव “Star of the week ” म्हणून प्रस्तावित करण्यासाठी आणि S.S.S…”संज्ञा संवर्धन संस्थेची” माहिती आपल्या सर्व मित्रांना करून देणयासाठीही !🙏🙏🙏

आणि…..आता महत्वाचे—येत्या आठवड्याचा स्टार म्हणून मी मोहन कुंडले ची निवड केली आहे.

रवींद्र


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *