Shantanu Pandurang Kulkarni शंतनु पांडुरंग कुलकर्णी 05/09/2021

Dear Shantanu, enjoy your special week with star status in this group of batchmates, who love you and shall love to know more about your life journey in India and Australia. There is lot for you to share and we are eager!! 👏👏
Vishwas Vidwans
मनापासून नमस्कार आणि धन्यवाद सर्व वर्ग मित्रांनो. Greetings and Good Day from down Under.
मला या आठवड्याचा चमकता सितारा केल्या बद्दल. तुम्ही सर्वांनी मला घासून पुसून मारून मुटकून आठवड्याचा तारा 🔯🌟 केलाय खरा पण मना पासून सांगा शंतनु कुलकर्णी म्हणाल्यावर डोळ्यात आणि मनात काही आठवण येते का? अंधुक धुसर असं काही डोळ्यासमोर येते का?
अवघड आहे कारण जेव्हा आपण शाळेत एकत्र होतो तेव्हा मला नाही वाटत की माझ्या मधे असे काही चमकदार गुण होते ज्या मुळे मी सर्वांच्या आठवणींत राहिन. या वरून आठवलं डिसेंबर २०१९ मध्ये पुण्यात असताना आपले वर्ग मित्र शिरीष मुजूमदार याने त्यावेळेला पुण्यात हजर असणाऱ्या आपल्या सर्व वर्ग मित्रांचं एक सहभोजन आयोजित केलं होतं. त्याला शिरीष आणि माझ्या बरोबर दिपक कुलकर्णी, आशुतोष, विश्वास आणि संजय माणकीकर हजर होते. त्या वेळी संजय माणकीकर बोलता बोलता म्हणाला की त्याला आठवतोय तो शाळेतला शंतनु कुलकर्णी म्हणजे लहानखोरा आणि गुटगुटीत मुलगा.
Well friends I will not disappoint you मी अजुनही लहानखोरा (बुटका) आणि गुटगुटीत (जाड) आहे. जवळपास पन्नास वर्षे होत आली पण अजुनही हडस हायस्कूलच्या आणि नागपूरच्या खूप काही प्रसन्न आठवणी मनात आहेत. पुढिल दोन चार चार दिवसांत त्यातील काही निवडक आठवणी मला तुम्हा सगळ्यांबरोबर शेयर करायला आवडेल.
त्याचबरोबरीने गेल्या पन्नास वर्षांतील माझ्या जीवनप्रवासातील काही ठळक प्रसंग आणि घटना पण शेयर करायला आवडेल. तर मित्रांनो पुन्हा एकदा मनापासून आभार आणि धन्यवाद.
शंतनु कुलकर्णी
Welcome Shantanu
It is definitely not मारून मुटकून One thing I disagree with you- तु शाळेत गुटगुटीत नव्हतास More from me during the week.
Ashutosh
नागपूरच्या खूप आठवणी मनात आहेत. सर्व प्रथम आठवतात ते नागपूरचे त्या वेळेचे प्रशस्त आणि मोकळे रस्ते. North Ambazari Road, South Ambazari Road, West High Court Road, Wardha Road. आता अजून तसेच आहेत का माहित नाही. कोणी नागपूरकर सद्य आणि खरी परिस्थिती सांगू शकेल का? पण जाणकार लोकं सांगतात की आता नागपूर ओळखता येणार नाही इतके बदलले आहे. नागपूर १९७६ मध्ये सोडले. त्या नंतर मनात असूनही पुन्हा एकदा भेट देता आली नाही याची खंत मनात आहे.
१९७५ साली ११ वी नंतर G.S. College of Commerce मधून B Com 1st year केलं आणि वडीलांची बदली कोल्हापूरला झाली. पण मी मात्र पुण्यात रहायचे ठरवले.
शंतनु कुलकर्णी
Shantanu, good to get a glimpse of your years after school mate. It is only because of you that we can say sun never sets on 11th Hadas 1975 batch. That being said keep the remaining part of the story coming.
Narendra देशपांडे
माझा जीवन प्रवास .. cont’d…
पुण्यात B Com केलं. चांगले मार्क्स मिळाले आणि CA करायचं ठरवलं. Side by side Taxation मध्ये Law Degree केली. CA पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो आहे लक्षात आल्यावर नोकरी करायची ठरवली. Eagle Flask Industries, Talegaon (Vacuum Flasks makers) येथे Management Information Systems department मध्ये join झालो. तीथे सुमारे ८ महिने काढले.
Meanwhile Kirloskar Groupचे Massive restructuring झाले होते त्यांच्या Corporate Finance Division मध्ये Management Trainee म्हणून join झालो. तिथे असताना Masters Degree in Management Studies पूर्ण केले. १९८४ ते १९९९ सूमारे १५ वर्ष तिथे काढलीं. खूप experience and knowledge मिळाले.


१९९९ मध्ये चंद्रशेखर आगाशे यांच्या बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट ग्रुप join केला. तिथे Oracle Financials या ERPवर बरेच काम केले. तिथे असताना Growel Softech या IT company कडून विचारणा झाली. त्यांना त्यांच्या एका Enterprise Solution Project साठी Project Manager / Financial Consultant पाहिजे होता. मग त्यांना join झालो. Bangur Group Calcutta (बांगड ग्रुप) यांच्या ब्यावर – राजस्थान येथील त्यांच्या श्री सिमेंटस या कंपनीसाठी Enterprise Solution Software Development and implementation प्रोजेक्ट होता. ब्यावर बद्दल अधिक माहिती साठी हितेंद्र पांडे आणि आशुतोष चितळे यांच्याशी संपर्क साधावा. (Hitendra & Ashutosh correct me if I am wrong). एक दिड वर्ष पुण्याहून जाऊन येऊन ते काम केले.
मग २००१ मध्ये मस्कत – ओमान येथे एका कंपनीत Software Implementation साठी गेलो. तिथे २००३ अखेर पर्यंत होतो. तिथून २००३ अखेरीस मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक होण्यासाठी गेलो. तेव्हा पासून आजतागायत मेलबर्न येथेच मुक्काम आहे. मेलबर्न येथे दोन तीन अतिशय मोठ्या आणि चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. नमूद करण्यासारखी म्हणजे General Electric Group मध्ये Management Accountant म्हणून काम करण्याची संधी.
सध्या म्हणजे २०२० पासून मी काम करणे बंद केले. त्यामुळे रिटायर झाल्यासारखे वाटते आहे. सध्या मी Husky कुत्रा 🐶🐕 पाळला आहे. त्याचे नाव MIKA आहे. तो सुमारे तीन वर्षांचा आहे. तो न चुकता मला सकाळी आणि संध्याकाळी मला एक ते दीड तास फिरायला नेतो. तेवढाच शरिराला व्यायाम.
सध्या तरी इथेच थांबतो… पुढचं पुढे
Shantanu कुलकर्णी
खूप छान. पुणे ओमान मेलबर्न अकाउंटंट-सॉफ्टवेअर-मॅनेजमेन्ट एवढी विविधता खूप कमी लोकांना अनुभवायला मिळते. एक हसतमुख मुलगा म्हणून मला तू आठवतोस. अनेक शुभेच्छा!
Pramod


That’s my perpetual Australian lockdown look…We are still under lockdown # 7.. Don’t know when it will be relaxed…
आशुतोष, सर्व प्रथम शतश: धन्यवाद. लक्ष्मी भुवन चौक व परिसरातील ठिकाणांची आठवण करून दिल्याबद्दल. बरोबर ५० वर्ष झाली या गोष्टीला. १९७२ साली माझ्या वडिलांची बदली नागपूर ला झाली तेव्हा आम्ही धरमपेठ मध्ये हनुमान मंदिर रोड वर अॅडव्होकेट ऊधोजी यांच्या बंगल्यात राहत होतो. हि जागा लक्ष्मी भुवन चौक पासून अगदी जवळ होती. घरुन लक्ष्मी भुवन चौक कडे जाताना लेखात नमूद केलेल्या सर्व ठिकाणे लागत असत. उदा. बापट बंधू, सरोज थिएटर इ. आणि चौकापासून जवळच आनंद भांडार मिठाई दुकान. त्यामुळे हा लेख वाचताना ५० वर्ष जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.
आमच्या या घरापासून जवळच अजित ओक आणि शिरिष मुजुमदार रहात होते आम्ही जाता येता नेहमी भेटायचो. सुमारे दिड वर्ष आम्ही तिथे रहात होतो. मग त्यानंतर रामदास पेठ मधे रहायला आलो. तिथे तुझी जवळीक वाढली आणि Rest is History as you know. १९७५ साली नागपूर सोडल्या वर पुन्हा नागपूर ला येणं शक्य झालं नाही. किर्लोस्कर मध्ये काम करत असताना एक दोन वेळा येता येता राहिले. आता कधी जमेल माहीत नाही.
शंतनु K
Leave a Reply