| Shyam Sharad Akant | शाम शरद आकांत | 11/04/2021 |
![]() |
शाम शरद आकांत
Hobbies:
|
मित्रांनो,खरे तर श्यामचा आज वाढदिवस नाही परंतु ह्या आठवड्याचा स्टार तो व्हावा अशी माझी मनोमन इच्छा होती. तर आपल्या या अजातशत्रू मित्रबद्दल चार अनुभवाचे बोल…
तशी श्यामची आणि माझी ओळख शालेय जीवनापासूनच. तो डागा लेऊट ला व मी जवळच म्हणजे गांधीनगरला रहात होतो. त्यामुळे साहजिकच तेंव्हा एकमेकांकडे अधुनमधून जाणे- येणे होते. पुढे कॉलेज शिक्षणापासून आमचे मार्ग वेगळे झालेत व संपर्क हळुहळु कमी होत गेला. पण विधिलिखित म्हणा, १९८०-८१ मधे B.Sc. करून श्याम आमचाच म्हणजे स्टेट बँकेत रुजू झाला. परंतु आमच्या शाखा वेगवेगळ्या त्यामुळे भेटी अधुनमधून च व्हायचा.
कालांतराने श्याम व सौ. शोभा वहिनींचे रेशीम बंध जुळलेत. सौ. शोभा वहिनी M.Sc.(Maths) B.Ed असून त्या नवोदय विद्यालय,वर्धा येथे कार्यरत होत्या. त्यांची एकुलतीएक कन्या प्रांजली आई बाबां सारखीच हुशार. ती B.E.(Electronics) असून Wipro, पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.
विद्यार्थीदशेत श्याम शांत, फारसा व्यक्त न होणारा, काहीसा अबोल असं व्यक्तिमत्व. आजही तो नवीन माणसा बरोबर ताबडतोब खुलत नाही. जुन्या वेस्पा गाड्या कितीही किक मारल्यातरी चालू होत नसत. पण एकदा जर व्हेस्पा गाडी वाकडी केली की ती एका किकमध्ये स्टार्ट होणारच. श्यामचेही तसेच आहे. त्याची गाडी सुरू व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो किंवा तो वेळ घेतो. अतिशय सालस स्वभाव, अभ्यासाशी प्रामाणिक आणि कामाशी काम ठेवणारा म्हणजे श्याम..
श्याम, तुला समस्त मित्रांकडून अनेक हार्दिक शुभेच्छा तसेच तुला व तुझ्या कुटुंबियांना आनंदी व निरामय जीवन लाभो हीच सदिच्छा..💐💐
अविनाश दाणी
Avinash, Nice introduction – made my job more difficult to write about him. U have aptly described his nature- I will try to add few words- फुल ना फुलाची पाकळी as they say
Ashutosh चितळे
Welcome to our Star of the week Shyam Akant. Once again a banker , that too my favourite SBI. One of the most innocent smile and a happy face. Silent but observant.
I haven’t spoken with him since school days but I remember his voice With short & complete statements with no confusion attitude
This week we all shall get chance to know more about him
विश्वास vidwans
सुंदर व साजेसे व्यक्तिचित्रण केले आहेस, अविनाश 👏👏👏👏.Wishing श्याम n family healthy, wealthy and non tired life💐🙏
मिलिंद सोमण
Dear shyam, a very simple and straight forward kirtankar of our batch and a colleague. I remember he would start kirtan whenever he got a chance to bindhas. Keep it up shyam.
I wish you a great second inning. 👍💐💐💐
Sanjay Girdhar
ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे
परंतू ज्ञाना नंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे🌹
असा आमचा मित्र श्याम आहे.
मित्रा खूप खूप शुभेच्छा🙏🙏
अनिल इंगोले
When we were in school Shyam and I used to go for NCC parade together – double sit in a bicycle two mornings every week. I used to ride the bike on the way to parade and Shyam on the way back. He was/is stronger than me and used to ride fast on the way back. We lived close by so I used to visit him frequently even after leaving the school. After leaving Nagpur I met him very infrequently. I remember once Mahajan sir asked him to take his bike and get a cigarette from paan Thela near University library. It was nice to reconnect again in Dec 2019. All the best Shyam and Vahini. Stay blessed.
Narendra देशपांडे, USA
सकाळी सुशीलने श्री. आकांत सरांचा उल्लेख केला होता.त्यामुळे सरांबद्दलची एक आठवण ताजी झाली..
सर, श्यामचे चुलत काका व आपल्याला ५-६ वित असतांना गणित शिकवायचे. ते माझ्या घराजवळच म्हणजे शंकरनगर ला राहायचे. मी अधुन- मधुन त्यांच्याकडे जात असे. त्यांचे हस्ताक्षर खूप सुंदर व वळणदार होते. आपल्या शाळेतील सगळे फलक त्यांच्याच अक्षरातील होते. त्यांच्याकडूनच मी वळणदार अक्षर काढावयास शिकलो ज्याचा फायदा मला आजगत होतोय.
त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..🙏
अविनाश दाणी
आकांत sir मला पण फार आवडायचे, थोडे रागीट जरूर होते पण गणित छान शिकवायचे. ते बहुदा वाशीम जिल्ह्य़ातील होते कारण माझे एक मामे काका जे की शिक्षक होते (अजून आहेत, age 82 ,धनंजय खरे )त्यांचे मित्र होते म्हणुन त्यांचे माझ्यावर थोडे प्रेमपूर्वक जास्तच LAKSHA असायचे व मला TE उत्तर दिल्यावर सोमण आडनावावरून एक MAN KA सौ MAN असे SAMBODHAYCHE व माझ्या काकांची आठवण काढायचे. 🙏
Milind Soman
Nice memories.. maths is Shyam’s वंशपरंपरागत strength. Will love to see handwriting.. must be good. Thanks Avinash Dani for sharing nice memories.
Vishwas
Well done avinash.
Shyam was and is a striking personality both quiet and happy. His dp in traditional dhotar was very impressive. He carries it very well.
In recent communications I realised his keen interest in maths. His other interests as told by avinash also are fascinating. Best wishes shyam
Pramod सहस्त्रबुद्धे
![]() |
![]() |
Shyam,
Calm & nature wise probably shy guy ☺️ सरळ simple व्यक्तिमत्व. Still in touch with Sanskrit.
One thing I must appreciate that he was present on all get together even with short notice . Felt his presence more in this group than in school days. I don’t have much to add except saying मम to what has been said about his qualities by Avinash , Vishwas , Pramod & others.
I wish him happy & healthy life & long 1st innings itself 🌷🌷
Ashutosh चितळे
विश्वास. सुश्या. संजय गिरधर. अविनाश. मिलिंद अशुतोष अनिल प्रमोद धर्मानंद राजीव तथा समस्त मित्रगण आपण जे उपदेश मार्गदर्शन संदेश स्तुतीसुमने उधळली त्याचा आदरपूर्वक स्विकार करतो व असाच स्नेह वृध्दींगत व्हावा ही अपेक्षा. १३ एप्रिल पासुन सुरू हिंदू नववर्ष विक्रमसवंत २०७८ साठी अग्रिम शुभेच्छा.
शाम आकांत
चुका काढण्यापेक्षा व्यक्त होण महत्वाच खरे खुले आऊटलेट बेस्ट मित्र आणि मैत्रिणी असतात. हसणै बोलणे रडणे भांडणे यातुन, व्यक्त होणे मुक्तहस्ते उधळणे आणि नविन भरारी घेणे
Shyam Akant
![]() |
6th July 2021
It was very short Home visit. Had lovely गरमागरम पोहे & tea |
Thanks Aashu for reminding Satellite branches are branches nearby cityscape let me discuss the advantage of working in satellite branch
- apart from City but still in radius of 15 to 30 km
- rural branch assignment is done by living in city
- work load is less compared to city
- opportunity to work on all desks so you enjoy the work while learning
- you are respected by customers
- these branches are generally Ladies branches because ladies have to work both front office and home
- being staff welfare sec. I recognised cooking hobby allow them to perform different simple dishes to enjoy
- diffent programmes were arranged by ladies club under innovative banking to upliftment of nari shakti which l witnessed
- I voluntary shared their office work and made them free for allied activities
- last but not least चारो तरफ गोपीय बिचमें कन्हैया
मी एस बी आय बुटीबोरी शाखेत असताना मला लेडिज स्टाफ म्हणायच्या मजा आहे तुमची घरी गेल्यावर आयत जेवायला मिळत. आमच तस नाही आम्हाला आधी धुणीभांडी स्वयंपाक करावा लागतो कितीही थकले तरीही.
असो, स्त्री आणि पुरूष संसार रथाची दोन चाके आहेत पण एका चाकावर जास्त जबाबदारी टाकतो घरकामाला अजून एका गोष्टीची किनार आहे घरच काम करणाऱ्या स्त्री ला पैशात मोबदला मिळत नाही त्यामुळे पुरुष ज्या कामातून आर्थिक कमाई होत नाही ते टाळतात पण आचारी सफाई कामगार वेटर हाऊस किपींग इत्यादी कामे पैसे घेऊन करतात अशावेळी घरातील कामांची जबाबदारी दोघांची आहे मदत हि ऐच्छिक असते तर जबाबदारी ही पार पाडाविच लागते स्त्रियांना मान सन्मान हक्क अधिकार आणि निसर्गाने मोठ्या प्रमाणात सहनशीलता प्रेमळपणा नियमितता आणि दृढता प्रदान केली आहे तिच्या अर्थे कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते मग घरच काम असो की व्यावसायिक त्या मातृशक्तीला प्रणाम
Shyam Akant
आत्ताच तुझी आठवण आली! हे कुणालाही, कधीही, कुणाकडूनही ऐकायला आवडतील असे शब्द…..
आपण कुणाच्या तरी आठवणीत आहोत, हे मनाला सुखावणारं….
आपला एखादा शब्द, एखादी कला, एखादा गुण किंवा केलेली कृती कुणाच्या तरी मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसते आणि कधी क्षणाची संधी मिळाली, की जमिनीतून झरा फुटावा तशी नेणीवेतून जाणिवेत येते…..
कधी सहजच काही आठवतं कुणाबद्दल,… अगदी छोटासाही संदर्भ पुरतो त्यासाठी…
फार काही विशेष नसलं, तरी दोन क्षण पुन्हा इतिहासात जातोच आपण,
आणि जेव्हा अशी एखादी आठवण, जी, खूप प्रयत्नांनी आपण अंतर्मनात ढकललेली असते….
केव्हातरी मनातल्या कुपीतून बाहेर पडतेच… आणि तेव्हा……
तेव्हा मग मनात श्रावण फुलतो… सगळं मन हळदीचं होऊन जातं…
चेहऱ्यावरचे भाव चटकन बदलतात….. कुणाशी तरी हितगूज करावंसं वाटतं….
पण नक्की काय ते कळत नाही…. मग आपणच बोलत राहतो आपल्या आठवणींशी………
बऱ्याच वेळा स्वतःशीच… शक्य झालं तर कधी दुसऱ्याशी….
स्वतःशीच हसतो… डोळे चमकतात…. नकळत आपला मुखवटा गळून पडतो,
चेहऱ्याची इस्त्री विस्कटते…. स्वतःचीच नव्याने ओळख होते….
छान मोकळं वाटायला लागतं… पण अगदी क्षणभरच……….आणि हा अनुभव फार छान असतो…
क्षणभर आपण आपले सगळे त्रास… सगळ्या dead lines विसरतो…
ढगाळलेलं आभाळ क्षणात स्वच्छ होतं….. अंगात अठरा हत्तींचं बळ संचारतं…..
काहीच अशक्य नाही असं वाटायला लागतं….. आणखी असंच काय काय होतं… अनुभवलंय कधी?
म्हणून म्हटलंय… आठवण स्वतःच एक साठवण असते…
ती आपली कुणी काढू दे… किंवा आपल्याला कुणाची येऊ दे…..
क्षणात आपल्याला क्षणभरासाठी का होईना… बदलवून टाकते… एवढं मात्र खरं.
म्हणून आजपासून एकच करूया…. कधी कुणाची आठवण आलीच, तर तडक त्या व्यक्तीला सांगून टाकूया….
“आज तुझी आठवण आली!”
पाहा मन किती हलकं होईल, प्रसन्न वाटेल…..!
Shyam Akant
…मित्र वेडेच असतात !!
केव्हाही येतात केव्हाही जातात
मनाची दारं उघडीचं टाकतात
आपल्या सुखात खळखळून हसतात
आपल्या दुःखात पिळवटून रडतात
मित्र वेडेच असतात.!!
जवळची नातीसुद्धा परकी होतात
दिलं ,घेतलं हिशाोबातअडकतात
तिथं हेच सावरायलाच असतात
सावरलंकी अलगद बाजुलाही सरकतात
मित्र वेडेच असतात.!!
रक्ताच्या नात्याचे नसतात .
अग्निसमक्ष जोडलेले नसतात
एखाद्या अवचित हळव्या क्षणी
अद्वैत साधून मनात शिरतात
मित्र वेडेच असतात.!!
सारे माझे तयांना ठाऊक असते
सारे तयांचे मला ठाऊक असते
कोठे काय बोलायचे उमजलेले असते
काय ओठांच्या आत हवे माहित असते.
मित्र वेडेच असतात.!!
बालपणीचे निरागस बंध
तारुण्यातील उनमत्त गंध
प्रौढपणीचा समजदार संग
अवघे आयुष्य माझे रंगारंग
मित्र वेडेच असतात.!!
मैत्री खरंच अशी अनमोल असते.
प्रत्येक जीवाने अनुभवायाचीअसते.
पण….पण…..
खुळ्या सोनेरी उन्हासारखी
आयुष्यात मैत्री जुळावी लागते.
मित्र वेडेच असतात !!
असे मित्र आणि मैत्री हि कोठेही मिळत नाही ,
आपल्या जवळच्या मित्रांना जपा..!!
Shyam Akant




6th July 2021
Leave a Reply